पांचा भूतांचे ब्रह्मांड । आणि पंचभूतिक हे पिंड ।।1।।

20 Mar 2021 17:17:58
 
 
g_1  H x W: 0 x
परमार्थाविषयीच्या काेणत्याही बाेलण्यात किंवा लिहिण्यात आणि विशेषत: श्रीसमर्थ ज्या अद्वैत तत्त्वज्ञानाचे उपासक आहेत त्याम ध्ये ‘‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’’ असा शब्दप्रयाेग अनेकदा वापरला जाताे. त्याचा अर्थ काय घ्यावयाचा याविषयी अनेक जण अनुमानाने स्पष्टीकरण देतात. ती वेगवेगळी असतात शिवाय प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर ती पटत नाहीत, अशी श्राेत्यांची शंका प्रगट हाेऊन ‘अनुमान निर्शन’ या पाचव्या समासाला प्रारंभ हाेताे. पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा व्यवहार एकाच पद्धतीने चालताे; पण प्रत्यक्षात तसा प्रत्यय येत नाही. ब्रह्मांडातील विष्णु, चंद्रमा, ब्रह्मा, नारायण आणि रूद्र हे आपल्या पिंडात अनुक्रमे अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांच्या द्वारे असतात असे मानले जाते.
 
आता या पाचही देवतांची अंत:करणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार कसे जाणावयाचे याची राेकडी प्रचिती मि ळत नाही. सर्व विद्वान केवळ अनुमानाने बाेलतात म्हणून ते पटत नाही. शिवाय ब्रह्मांडामध्ये तेहतीस काेटी देव, अठ्याएेंशी हजार ऋषी, साडेतीन काेटी भुते, साडेतीन काेटी तीर्थक्षेत्रे, साडेतीन काेटी मंत्र, छप्पन काेटी चामुंडा, नऊ काेटी कात्यायनी देवता आणि चाैऱ्याएेंशी लक्ष वेगवेगळ्या याेनीतील काेट्यवधी जीव आहेत. शिवाय असंख्य वनस्पती, फळझाडे, वृक्षवेली, शेतीवाड्या आहेत. हे सर्व पिंडामध्ये आहे, हे सप्रमाण सिद्ध करता येत नाही व त्यामुळे ‘‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’’ हे तत्त्व चुकीचेच अनुमान आहे, असे श्राेत्यांना वाटते.
या शंकेचे निरसन करताना श्रीसमर्थ म्हणतात की, अनुमान अथवा काेणाची तरी विधाने यांनी सत्य ज्ञान सिद्ध हाेत नाही तर केवळ प्रचितीनेच सत्य ज्ञान सिद्ध हाेते. जेथे अनुभव शून्याकार असताे तेथे विचार आणि चिंतन करूनही हाती काेणतेही सार लागत नाही.
Powered By Sangraha 9.0