जगभरात जुळ्या मुलांचे प्रमाण वाढत असून, जगात दर चाळीस मुलांमागे एक जुळी असतात. ‘इन व्हिट्राे फर्टिलायझेशन’च्या (आयव्हीएफ) तंत्रज्ञानामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
‘ह्यूमन रिप्राॅड्नशन’ या विज्ञानविषयक नियतकालिकात याबाबत एक लेख प्रसिद्ध झाला असून, त्यातील माहितीनुसार, जगात दरवर्षी सुमारे 16 लाख जुळी मुले जन्माला येतात. गेल्या पन्नास वर्षांतील संख्येपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संशाेधकांनी 135 देशांतील 2010-15 या काळात जन्मलेल्या मुलांची आकडेवारी तपासली. जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण आफ्रिकेत सर्वाधिक असल्याचे त्यातून समजले. गेल्या चाळीस वर्षांत जन्मलेल्या मुलांमध्ये एक तृतीयांश जुळी मुले असल्याचेही स्पष्ट झाले.
या संशाेधनात सहभागी झालेले एक शास्त्रज्ञ आणि ऑ्नसफाेर्ड विद्यापीठातील प्राध्यापक ख्रिस्तियन माॅन्डेन म्हणाले, ‘विसाव्या शतकाच्या मध्यानंतर आता जुळ्या मुलांच्या जन्माचे प्रमाण जास्त आहे. 1970 मध्ये विकसित देशांत गर्भधारणेसाठी मदत करणारे तंत्रज्ञान (एआरटी) उदयाला आले.
या तंत्रज्ञानामुळे जुळ्या मुलांच्या जन्माचे प्रमाण वाढले. सध्या अनेक महिलांना प्राैढ वयात मूल हाेते आणि या वयात जुळी मुले हाेण्याची श्नयता जास्त असते.
गर्भनिराेधके वापरण्याचे प्रमाणही सध्या वाढले आहे. फर्टिलिटी रेट कमी हाेणे हेसुद्धा एक कारण आहे.’ पण जुळी मुले हाेण्याचे प्रमाण गरीब किंवा विकसनशील देशांत जास्त असणे हेही चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. या मुलांना वाढविणे गरीब पालकांना श्नय हाेत नाही आणि वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत एक मूल मरण पावते.दरवर्षी जगभरात अशी दाेन-तीन लाख मुले मरण पावतात, असे त्यांनी सांगितले.