नाशिकमध्ये वीकेंड लाॅकडाऊन घाेषित

    11-Mar-2021
Total Views |
जल्ह्यात 15 मार्चनंतर लग्नसमारंभांना परवानगी नाही
 
as_1  H x W: 0
 
नाशिक, 10 मार्च (आ.प्र.) : नाशिकमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कठाेर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नव्याने लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधांसंदर्भातील पत्रक जारी केले आहे. विशेष म्हणजे या नव्या निर्बंधांत 15 मार्चपासून लाॅन्स, मंगल कार्यालये, हाॅल आणि अन्य ठिकाणी लग्न समारंभ, तसेच इतर कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.पुढील आदेश मिळेपर्यंत लग्नसमारंभांसाठी मंगल कार्यालय मालकांनी हाॅल देऊ नयेत, असे सांगण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर काेराेनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध लागू करण्यासंदर्भातील मुद्द्यांचा समावेश असणारे पत्रक जारी केले आहे. जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या कालावधीत सुरू ठेवता येतील. यामधून अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, भाजीपाला, फळे, किराणा, दूध आणि वृत्तपत्र वितरणास सूट देण्यात आली आहे.प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. याचप्रमाणे सर्व आठवडे बाजार पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.खाद्यगृहे, परमिट रूम किंवा बार सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी असली, तरी आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच परवानगी देता येईल.
हाेम डिलिव्हरीही रात्री दहापर्यंतच सुरू ठेवता येईल. जिम, व्यायामशाळा, स्पाेर्ट्स काॅम्प्लेक्स, मैदाने, स्विमिंग पूल वैय्नितक सरावासाठी सुरू राहतील. धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात वेळेत सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी मंदिरे पूर्णपणे बंद राहतील.