‘बार्टी’मार्फत पाेलिस भरतीपूर्व ऑनलाइन प्रशिक्षण आयाेजित

01 Mar 2021 15:48:41
 
xs_1  H x W: 0
 
पुणे, 28 फेब्रुवारी (आ.प्र) : बार्टीमार्फत पाेलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन मार्गदर्शन सुरू करण्यात आले असून, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पाेलिस भरतीपूर्व लेखी परीक्षेकरिता 2 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी, रविवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पाेलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्यज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण 4 अभ्यास घटकांचे दिवसाला 2 तास याप्रमाणे ऑनलाइन प्रशिक्षण असेल.प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील.
सदर प्रशिक्षण वर्ग बार्टीच्या ‘बार्टी ओन्लियन’ या यूट्यूब चॅनलवरूनही थेट प्रसारित करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक, अशा घटकांचा सखाेल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य, मार्गदर्शकांच्या नाेट्स याबाबत सखाेल मार्गदर्शन केले जाईल.उमेदवारांच्या शंकांचे निरसन ई- मेलद्वारे करण्यात येईल.बार्टीद्वारे आयाेजित ऑनलाइन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी, समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येईल.इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टीच्या www.barti.inया वेबसाईटवर, नाेटीस बाेर्ड तसेच ई-बार्टी अ‍ॅपमधील ‘एम-गव्हर्नन्स’अंतर्गत पाेलिस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0