राज्यात आजपासून कृषी ऊर्जा पर्वास प्रारंभ

    01-Mar-2021
Total Views |
कृषिपंप वीजजाेडणी धाेरणाच्या प्रसारासाठी महावितरणकडून कार्यक्रमाचे आयाेजन
 
cw_1  H x W: 0
 
मुंबई, 28 फेब्रुवारी (आ.प्र.) : राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजाेडणी, दिवसा 8 तास साैर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन माेठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषिपंप वीजजाेडणी धाेरण-2020 जाहीर केले असून, महावितरणद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या धाेरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी राज्यभर साेमवारपासून (1 मार्च) 14 एप्रिलपर्यंत कृषी ऊर्जा पर्व राबवले जाणार असून, जनजागृतीसाठी कार्यक्रम आयाेजिण्यात आले आहेत.या पर्वाचा प्रारंभ साेमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित राहणार आहेत.या पर्वात संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, खासदार, आमदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कृषी ग्राहक प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हा, तालुका स्तरावर व माेठ्या गावांत कृषी वीजग्राहक मेळावे आयाेजित केले जाणार आहेत. यात माझे वीजबिल, माझी जबाबदारी माेहिमेस सुरुवात केली जाईल. थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीजजाेडणी, मंजुरीचे काेटेशन, वीजजाेडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. याबराेबरच ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदांच्या समन्वयाने ग्रामसभा आयाेजित करून त्यात कृषी वीज धाेरणाची माहिती दिली जाणार आहे.ग्राहक संपर्क अभियानात कृषी थकबाकीदार ग्राहकांना एसएमएस व साेशल मीडियाद्वारे धाेरणाची माहिती देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून वीजबिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या माेहिमेद्वारे जनजागृती करून महावितरणतर्फे कृषी वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यास प्राेत्साहित केले जाणार आहे.