
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ।। तैसे चित्तशुध्दि नाही। तेथे बाेध करील काई ।। वृक्ष न धरि पुष्पफळ । काय करील वसंत काळ ।। वांजे न हाेती लेकुरें । काय करावें भ्रतारें ।। नपुंसका पुरूषासी । काय करील बाई त्यासी ।। या अभंगातून महाराजांनी एक बाजू जी किंचीतही प्रतिसाद देण्यास पात्र नसेल, पूर्णत: नकारात्मक किंवा व्यर्थ असेल तर दुसऱ्या बाजुने हाेणारा प्रयत्न व्यर्थ जाऊ शकताे. मळालेले कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे पाणीच जर घाण असेल तर कपड्याला कितीही साबण वापरले तरी कपडे स्वच्छ धुतले जाणार नाहीत. जर एखाद्याची ऐकण्याची मानसिकताच नसेल, म्हणजेच जर त्याचे चित्त शुध्द नसेल तर त्याला बाेध करणे व्यर्थ असेल. वृक्षाला ूल, फळ येतच नसेल, म्हणजेच वृक्षातच मूळत: कमजाेरी असेल तर वसंतऋतू तरी काय करणार ? एखाद्या स्त्रीचे गर्भाशय गर्भधारणेस याेग्य नसेल तर त्या स्त्रीच्या गर्भधारणेसाठी पुरुष काही करू शकत नाही. याप्रमाणे पुरूषच जर नपुंसक असेल तर जाेडीदार स्त्रीला नाव ठेवण्यात काय अर्थ ? अर्थात, अशा परिस्थितीत स्त्री काही करू शकणार नाही. यातून बरेच काही घेण्यासारखे आहे. आपण चांगले घ्यायचे ठरवले तर निश्चितच आपण चांगले घेऊ शकताे. जय जय राम कृष्ण हरी। -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माउली निवास, श्री माऊली नगर, जालना.माे. 9422216448