काेणते फाेटाे घरात लावाल?

    25-Feb-2021
Total Views |
घनदाट जंगल, हिंस्र प्राणी, लाल रंगाच्या तसबिरी, ऐतिहासिक किंवा युद्धप्रसंगातील तसबिरी, पेंटिग्ज घरात लावू नयेत. यामुळे कुटुंबात तणाव वाढताे.
 
cf_1  H x W: 0
 
प्रत्येकाच्या घरात फाेटाे फ्रेम ही असतेच.जुन्या काळी प्रत्येकाचा घरी देवदेवतांचे फाेटाे जास्त प्रमाणात असत. आताही गावाकडच्या घरांत ते असताताच; पण शहरात आता फ्लॅटसंस्कृती माेठ्या प्रमाणात रुजलेली आहे.अशा चकचकीत फ्लॅटमध्ये सर्व घरभर भिंतींवर फाेटाे किंवा तसबिरी नसतात. देवांचे फाेटाे असले तरी ते देवघरात असतात. तरीही काही जणांना घरात फाेटाे लावण्याची हाैस असते.त्यांनी ते कसे लावावेत, याची माहिती असणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार, घरात हसऱ्या चेहऱ्यांची तसबीर लावणे फायदेशीर मानले जाते.अशा तसबिरींमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार हाेताे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभाव वाढीस लागताे. नातेसंबंध दृढ हाेण्यास मदत हाेते. यामुळे एकूण काैटुंबिक वातावरण उत्तम राहते. मानसिक प्रसन्नता लाभते. कुटुंबातील सदस्य आनंदी राहण्यास या प्रकारच्या तसबिरी सहायक ठरतात. वास्तुशास्त्रानुसार, वाहत्या पाण्याची तसबीर घरात लावणे लाभदायक ठरू शकते. शांतपणे वाहणारे पाणी हे साैभाग्याचे लक्षण मानले जाते. एखादा धबधबा, नदी, तलाव, ओढा किंवा समुद्राशी संबंधित तसबीर घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे भाग्य प्रबल हाेते. एखादे प्रलंबित काम मार्गी लागण्यास किंवा कामे पूर्ण हाेण्यास अडचणी येत असल्यास अशा प्रकारची तसबीर उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. मात्र, शांतपणे वाहणाऱ्या पाण्याची तसबीर लावावी, असा सल्ला दिला जाताे.कार्यक्षेत्रात प्रगती हाेण्यासाठी मेंढ्यांच्या कळपाचा फाेटाे लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्र देते. यामुळे धनवृद्धी आणि भाग्यवृद्धी हाेण्यास मदत हाेते, असे सांगितले जाते. मात्र, काेणत्या प्रकारच्या तसबिरी, फाेटाेज वा पेंटिग्ज घरात लावू नये, यावर वास्तुशास्त्र भाष्य करते. घनदाट जंगल, हिंस्र प्राणी, लाल रंगाच्या तसबिरी, ऐतिहासिक किंवा युद्धप्रसंगातील तसबिरी, पेंटिग्ज घरात लावू नयेत. यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण वाढीस लागते. नातेसंबंधात कटुता निर्माण करणाऱ्या घटना घडू शकतात. यामुळे नकारात्मता वाढीस लागण्याची शक्यता असते. एकूण घरावर आणि कुटुंबावर याचा प्रतिकूल परिणाम हाेऊ शकताे, असे सांगितले जाते.