प्रेमाला चांगल्या प्रकारे समजून घ्या

25 Feb 2021 17:02:36
आकर्षणातून उद्भवलेले प्रेम अधिक काळ टिकत नाही.कारण ते अजाणतेपणातून आणि माेहातून आलेले असते.
 
t61_1  H x W: 0
 
प्रेम हे जगण्याचे महत्त्वाचे साधन असते. प्रत्येक व्यक्ती हा प्रेमाचा भुकेला असताे. त्याला प्रेम हे हवेच असते; पण प्रेम टिकणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रेम कशाप्रकारचे आहे त्याला महत्त्व असते.आकर्षणातून उद्भवलेले प्रेम अधिक काळ टिकत नाही. कारण ते अजाणतेपणातून आणि माेहातून आलेले असते. आजकाल असे प्रेम बहुतेक विवाहांमध्ये दिसून येते. एकदा खरे रूप ओळखले की आकर्षण चुटकीसरशी संपून जाते आणि मन विटून जाते.अशा प्रकारे प्रेम ओसरते आणि त्याजागी भय, शंका, असुरक्षितता आणि दुःख येते. एखाद्या जुन्या जिवलग मित्राबद्दल जशी आत्मीयता वाटते तशी अनाेळखी माणसाबद्दल वाटत नाही. नव्याने झालेले प्रेम सहवासाने वाढते; पण त्या प्रेमात राेमांचकता, उत्साह किंवा आवेग नसताे.ईश्वराबद्दलचे प्रेम या सर्वांहून श्रेष्ठ असते. ईश्वरी प्रेम नित्य-नूतन राहते. तुम्ही अधिक निकट याल तितकी अधिक ओढ आणि सखाेलता तुम्हाला प्राप्त हाेते.या प्रेमात सुख, उत्साह आणि आत्मीयता सगळे आहे. या प्रेमात कधीही निरसता येत नाही. हे सर्वांना प्रसन्न आणि जागृत ठेवते.सांसरिक प्रेम महासागरासारखे असू शकते; पण महासागरालाही एक तळ असताे. ईश्वरी प्रेम आकाशासारखे आहे, असीम, अनंत. महासागराच्या तळापासून वर विशाल नभापर्यंत झेप घ्या! ज्ञान प्रसंगातीत आहे, अनंत वस्तुपार आहे. प्रेम व्यक्तीतीत आहे. ज्ञान प्रसंगाच्या पलीकडचे असते. प्रत्येक प्रसंग तुमची जाणीव निरनिराळ्या रंगांत रंगवत असताे. सुख, वेदना, आनंद, शाेक, क्राेध, मत्सर आदी. प्रत्येक प्रसंग सत्य स्थितीचा विपर्यास करताे. सत्य हे विशिष्ट प्रसंगाच्या रंगछटांच्या पलीकडले असते.त्यामुळे प्रेमाला कधीही पारखे हाेऊ नका. तुम्ही समाेरच्यावर निरलसपणे प्रेम करा, त्याचा परतावा तुम्हाला चांगलाच मिळेल, याची खात्री बाळगा.
 
Powered By Sangraha 9.0