नवी मुंबईत संक्रमण शिबिरे उभारा

    25-Feb-2021
Total Views |
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
 
sw_1  H x W: 0
 
नवी मुंबई, 24 (आ.प्र.) : नवी मुंबईमध्ये माेठ्या प्रमाणावर धाेकादायक इमारती आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी संक्रमण शिबिरे उभारणे आवश्यक आहे.या शिबिरांसाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.वाशीत एका कार्यक्रमात शिंदे यांच्या हस्ते वाशीतील श्रद्धा आणि कैलास या आणखी दाेन साेसायट्यांना पुनर्विकासासाठी बांधकाम परवानगी देण्यात आली. त्या वेळी शिंदे बाेलत हाेते.एमएमआरडीए क्षेत्रासाठी एकच युनिफाईड डीसीआर तयार करताना सर्व शहरांतील वेगवेगळ्या परिस्थितींचा विचार करण्यात आला आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांनुसार आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे धाेकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. या डीसीआरमुळे नवी मुंबईत फक्त सिडकाेने बांधलेल्याच नव्हे, तर अन्य धाेकादायक इमारतींचा पुनर्विकासही मार्गी लागणार आहे, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.महाविकास आघाडी सरकारने युनिफाईड डीसीआरमध्ये सर्व अनुकूल बदल केले आहेत. प्रकल्प रखडवण्यास नव्हे, तर सर्वसामान्यांना हक्काचे माेठे घर देण्यास विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सामान्य नागरिकांचे हित नजरेसमाेर ठेवून निर्णय घेतले आहेत. या एफएसआयचा फायदा फक्त सिडकाेच्या धाेकादायक इमारतींनाच नाही, तर माथाडी कामगारांच्या चाळींना आणि प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपाेटी बांधलेल्या घरांनाही हाेणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.