काेराेना नियम उल्लंघन प्रकरणी ठाण्यात पाच बार सील

    25-Feb-2021
Total Views |

sw_1  H x W: 0  
 
ठाणे, 24 फेब्रुवारी (आ.प्र.) : साेशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दाेन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करूत ते पाचही बार रात्री उशिरा सील केले. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्क वापरण्यासाेबत साेशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे, तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तत्काळ सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दाेनच दिवसांपूर्वी दिले हाेते.त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने छापे टाकून ही कारवाई केली.या कारवाईत नाैपाडा आणि माजिवडा मानपाडा प्रभागात दाेन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नाैपाडा प्रभागातील एलबीएस राेडवरील शिल्पा बार हा ऑर्केस्ट्रा बार उपायुक्त (अतिक्रमण) अशाेक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त प्रणाली घाेंगे यांनी सील केला. माजिवडा मानपाडा प्रभागात कापूरबावडी येथील सनसिटी या ऑर्केस्ट्रा बारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पाेप टेट्स आणि मायझाे हे तीन बार उपायुक्त (अतिक्रमण) अशाेक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले. या पाचही आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काेणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.