लठ्ठपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सात तासांहून अधिक झाेपा...

24 Feb 2021 16:09:20

ws_1  H x W: 0  
 
लठ्ठपणा ही आजच्या जीवनशैलीतील सगळ्यात माेठी समस्या आहे. वेगाने वाढणारी ही समस्या विशेषतः जास्त वेळ बसून काम करणाऱ्यांसाठी गंभीर ठरत आहे. अशावेळेस लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे खूप माेठे आव्हान आहे. जर तुम्ही या समस्येने ग्रस्त असाल तर एका संशाेधनाकडे लक्ष द्या. दरराेज सात ते आठ तास अवश्य झाेपा. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागाेमध्ये झालेल्या एका अध्ययनानुसार, रात्री व्यवस्थित झाेप न हाेण्याने चयापचयाची क्रिया कमजाेर हाेते. ज्यामुळे पचनयंत्रणेशी संबंधित गडबड निर्माण हाेते. यामुळे लठ्ठपणा वाढताे. ज्या व्यक्ती पाच तास किंवा त्याहून कमी झाेपतात, त्यांच्या शरीराचं वजन वाढण्याची शक्यता जे लाेक आठ तास झाेपतात, त्यांच्या तुलनेत 32 पट अधिक असते. पाच तासांहून कमी वेळ झाेपणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या हाेण्याची शक्यता पंधरा टक्क्यांनी अधिक असते.
Powered By Sangraha 9.0