साेनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

24 Feb 2021 16:14:56

c_1  H x W: 0 x 
 
मुंबई, 23 फेब्रुवारी (आ.प्र.) : बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांना थंडीपासून बचावासाठी पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित करणारे संशाेधक-तंत्रज्ञ साेनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. ‘ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमची जिद्द आणि समर्पणाला साेनमजी सलाम’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे काैतुक केले आहे.देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेने सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयाेग व्हावा, यासाठी धडपडणे यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात. बर्फाच्छादित प्रदेश, कडाक्याची थंडी या निसर्गाच्या प्रकाेपाला ताेंड देतानाच, देशाच्या सीमेवर कुरघाेड्या करणाऱ्या शत्रूलाही जरब बसवण्यासाठी आपले जिगरबाज जवान डाेळ्यात तेल घालून सतर्क असतात. या जवानांचा आणि पर्यावरणीय समताेलाचा विचार करून तुम्ही संशाेधित केलेल्या सुविधा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील. देशाप्रति तुमची ही बांधिलकी तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल, असा विश्वास आहे. तुमच्या अशा सर्व प्रयत्न, प्रकल्पांना जरूर पाठबळ देऊ, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0