गुंतवणुकीसाठी राज्याराज्यांत निकाेप स्पर्धा असावी : मुख्यमंत्री

    23-Feb-2021
Total Views |
नती आयाेगाच्या सहाव्या बैठकीत सूचना
 
c_1  H x W: 0 x
 
मुंबई, 22 फेब्रुवारी (आ.प्र.) : उद्याेग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा बाहेरच्या देशांबराेबर असली पाहिजे. राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा असू नये. केंद्राने यासाठी कार्यक्षमता व गुंतवणुकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकाेप स्पर्धेला प्राेत्साहन द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निती आयाेगाच्या सहाव्या बैठकीत केली.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक घेण्यात आली. काही राज्ये वीज सवलतीच्या किंवा जागेच्या दराच्या आकर्षक ऑफर देतात. बार्गेनिंग केले जाते. अमुक राज्य या गाेष्टी द्यायला तयार आहे, तर तुम्ही काय देणार असे विचारले जाते, राज्याराज्यांत स्पर्धा जरूर व्हायला हवी, पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी, तर राज्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमता आणि उपलब्ध सुविधांवर निकाेप अशी व्हावी.तसे झाल्यासच सर्व राज्यांना त्याचा फायदा हाेईल.केंद्राने गुंतवणुकीसंदर्भात काही निकष ठरवायला हवेत. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार न करता राेजगार किती मिळणार आहे याचाही विचार झाला पाहिजे. तसे झाले तर खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर बनू असे मुख्यमंत्री म्हणाले.काेराेना काळात प्रतिकूल परिस्थिती असूनही महाराष्ट्राने 1 लाख काेटींपेक्षा जास्त सामंजस्य करार केले. विकास मंदावला असला, तरी ताे थांबला नाही.उलट विविध मार्गानी आम्ही अर्थचक्राला गती दिली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.