जागृती, दक्षता, खबरदारी वाढवल्यास काेराेनाचा प्रसार थांबेल : राज्यपाल

    23-Feb-2021
Total Views |

d_1  H x W: 0 x
 
मुंबई, 22 फेब्रुवारी (आ.प्र.) : काेराेनाचा काळ देशासाठी परीक्षा पाहणारा हाेता. गेल्या वर्षभरात देशाने काेराेनाचा मुकाबला उत्तम प्रकारे केला.परंतु, काेराेना अद्याप संपलेला नाही.त्यामुळे सर्वांनी निरंतर जागृती, दक्षता व पुरेशी खबरदारी घेतल्यास काेराेनाचा नव्याने हाेणारा प्रसार निश्चितपणे नियंत्रणात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी येथे केले.भारतीय पाेलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी कैसर खालिद यांनी स्थापन केलेल्या ‘पासबान ए अदब’ या संस्थेतर्फे राजभवनात आयाेजित कार्यक्रमात काेराेना याेद्ध्यांच्या सत्कार साेहळ्यात राज्यपाल बाेलत हाेते. सार्वजनिक उपक्रम, वित्तीय संस्था, काॅर्पाेरेटस, उद्याेग समूह व सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष, तसेच प्रमुखांचा आणि वैयक्तिक काेराेना याेद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काेराेना काळात पासबान ए अदब संस्थेने केलेल्या मदतकार्याची माहिती कैसर खालिद यांनी दिली.प्रसिद्ध शेफ संजीव कपूर, अभिनेत्री परिझाद झाेराबियन, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष इम्तियाजूर रहमान, न्यू इंडिया इन्शुरन्सचे अध्यक्ष अतुल सहाय, भारतीय जीवन विमा महामंडळाचे (एलआयसी) व्यवस्थापकीय संचालक विपिन आनंद, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष पल्लव महापात्रा, आयडीबीआयचे संचालक सुरेश खातनहार यांसह 50 काेराेना याेद्ध्यांचा या वेळी शाल व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.