काेराेनाच्या भीतीमुळे ताणात वाढ; 19 देशांमधील अभ्यासातून निष्कर्ष

    23-Feb-2021
Total Views |
 
अस,_1  H x W: 0
 
प्रत्येक तीन प्राैढ व्यक्तींच्या मागे एका व्यक्तीवर काेविड-19 आजारामुळे ताण आला आहे, असे एका नव्या अभ्यासातून समाेर आले आहे. विशेषतः स्त्रिया, तरुण आणि समाजातील कनिष्ठ स्तरावरील नागरिकांवर हा ताण अधिक आहे, असे यातून दिसून आले आहे.
‘प्लाॅस वन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांवर अधिक ताण येताे. बेचैनी आणि नैराश्य यांचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. याचे कारण म्हणजे स्त्रियांचे सामाजिक स्थान पुरुषांच्या स्थानाच्या तुलनेत दुय्यम असते आणि स्त्रियांना आराेग्याच्या सुविधा पुरुषांच्या तुलनेत कमी मिळतात, याचा स्त्रियांच्या मानसिक आराेग्यावर अधिक परिणाम हाेताे. असे सिंगापूर येथील संशाेधक टाझीन जफर यांनी म्हटले आहे. साथराेगा दरम्यानच्या काळात या संबंधात संशाेधन करण्यात आले. त्यासाठी 19 देशांमधील 2 लाख 88 हजार 830 जणांना प्रश्न विचारण्यात आले हाेते. हे प्रश्न बेचैनी आणि नैराश्य या विषयांशी संबंधित हाेते. काेविड-19 मुळे अस्वस्थता आणि नैराश्य येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक दिसून आले. विशेषतः काेराेना विषाणूच्या संसर्गाची भीती अधिक आली. या भीतीतूनच मानसिक ताण वाढत जात आहे.