वृश्चिक

    21-Feb-2021
Total Views |
हा आठवडा प्रियपात्रांसाेबत भेटी व कम्युनिकेशन वाढवील. ज्यामुळे तुम्ही राेमँटिक विचारात हरवून जाल, पण विवाहितांनी थाेडे भान राखायला हवे. तुम्ही परस्परांवर जास्त विश्वास ठेवायला हवा. अन्यथा याचे विपरित परिणाम समाेर येतील. अखेरच्या काळात कार्यक्षेत्रात खास व्यक्तीशी जवळीक वाढेल.
 
नाेकरी/व्यवसाय : भागीदारीत तुम्ही पुढे जाण्याचा विचार कराल. यामध्ये करार करावयाचा असल्यास प्रारंभीचा काळ तुमच्यासाठी याेग्य असेल. शेअरबाजार, ट्रेडिंग इ. कामात दीर्घकालीन याेजना बनवून काम कराल तर फायदा हाेऊ शकताे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्यामध्ये एखाद्या खास व्यक्तीविषयी वाढते आकर्षण असल्यामुळे संबंध वाढवण्याची खूप इच्छा राहील. पण जे पूर्वीपासून संबंधात असतीील त्यांचा अहंकार त्यांना तणाव देऊ शकताे. तसाच जाेडीदाराचा राग जास्त असल्यामुळे तुम्ही डाेके शांत ठेवावे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमच्या तब्येतीत चढ-उतार राहील. अर्थातच तुम्हाला फिटनेस लक्षात ठेवून नियमित व्यायाम व याेगासारख्या गाेष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे. पूर्वार्धात अवाजवी जेवण करणे टाळावे. ज्यांना एखादा गंभीर आजार असेल त्यांनी अखेरच्या दाेन दिवसांत दक्षता बाळगावी.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : , पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात विशिष्ट परिस्थिती वगळता दिवसा व संध्याकाळी झाेपू नये. वादविवाद टाळावा.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला गूळ-फुटाणे अर्पण करावेत. यामुळे संततीची तब्बेत उत्तम राहून त्याला भरपूर मानसन्मान मिळेल.