तूळ

    21-Feb-2021
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी तुमच्या अपेक्षेनुसार असणार आहे. तुमच्या काही याेजना फलद्रूप हाेऊन तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतील. नाेकरदारांना कामातून आनंद लाभेल आणि यशही मिळेल. पण तुमचा स्वाभिमान दुखावला जाण्याची शक्यता आहे. यासाठी थाेडे सावध राहण्याची गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : सरकारी कामे, काॅन्ट्रॅ्नट, औषधे, सरकारी कचेरीत नाेकरी, प्रिटिंग, फार्मास्युटिकल संबंधित सेवा इ.त तुमची प्रगती हाेईल. नाेकरदारांना उच्चपद मिळण्याची, नवी जबाबदारी मिळण्याची श्नयता आहे. नवे करार जपून करावेत.
 
नातीगाेती : हा आठवडा प्रेमसंबंधाबाबत ठीकठाक असला तरी दांपत्यजीवनात तुम्हाला तुमचा राग वारंवार सतावू शकताे. जे पूर्वीपासून प्रेमसंबंधात असतील त्यांच्यामध्ये जवळीक वाढेल. विवाहाेत्सुकांना उपयुक्त जाेडीदार मिळू शकताे. प्रेम व्यक्त करताना स्पष्टपणा ठेवायला हवा.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता उत्तम असेल.ज्यांना पूर्वीपासून पचन, पाेटदुखी, पित्त, कंबरदुखी, रक्तविकार, हृदयाची अनियमित धडधड इ. असेल त्यांच्यामध्ये थाेडा त्रास असेल. पण एकूणच नकारात्मक न राहिल्यास आराेग्य उत्तम राहणार आहे.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणताही निर्णय शांतपणे व समजूतदारपणे घ्यावा. वाहन जपून चालवावे.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला गूळ-फुटाणे अर्पण करावेत. यामुळे संततीची तब्बेत उत्तम राहून त्याला भरपूर मानसन्मान मिळेल.