सिंह

    21-Feb-2021
Total Views |
या आठवड्यात तुमचा परफाॅर्मन्स सुधारत जाईल. आर्थिक रूपात तुमचे अनेक फायदेही हाेऊ शकतात. अचानक धनलाभ हाेऊ शकताे. कार्यक्षेत्रात स्वत:ची याेग्यता दर्शवण्याची संधी लाभेल. मित्र व नातलगांशी पैशाचा व्यवहार करणे टाळावे. तसेच गुंतवणुकीची याेजना विचारपूर्वक बनवावी.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही शक्यतो काेणताही साैदा करण्यापासून दूरच राहावे. अन्यथा नुकसान हाेऊ शकते. सध्या तुम्हाला कामात प्रगती करण्याची तीव्र इच्छा हाेईल. भागीदारीच्या कामकाजात प्रगती हाेण्याच्या संधी आहेत पण त्यामध्ये वेग काहीसा मंद राहील. धंदा-व्यवसाय जाेमात कराल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात सतत भरती-ओहाेटीची स्थिती राहील. ज्याचा संबंधावर परिणाम हाेऊ शकताे. तुमच्यामध्ये सध्या आकर्षण खूप वाढल्यामुळे राेमान्सच्या विचारात मग्न राहाल. पण यामध्ये ग्रहांची साथ मिळणार नाही. यामुळे संबंधात अनिश्चितपणा राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्येत उत्तम राहील. मानसिक दिलासा मिळण्यासाठी आप्तजनांसाेबत जवळच्या जागी पिकनिक-प्रवासाचे आयाेजन कराल. ज्यांना ब्लडप्रेशर, डाेकेदुखी, हाडांचा ठिसूळपणा, डाेळ्यांची जळजळ अशा समस्या असतील त्यांनी थाेडे लक्ष द्यायला हवे.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात प्रवास करताना वा खेळताना दुखापत हाेणार नाही याची काळजी घ्यावी.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला सफरचंद अर्पण करावे. संततीच्या करियरमधील अडथळे दूर हाेतील. काैटुंबिक समस्या संपतील.