मिथुन

    21-Feb-2021
Total Views |
या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीची भेट हाेईल जी तुमच्या भावी जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणील. आराेग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी ठीकठाक राहणारा असेल. व्यापार व कार्यक्षेत्रात स्वत:ची ऊर्जा वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि शानदार प्रदर्शन कराल.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा नाेकरदारांसाठी प्रगतिकारक ठरणारा आहे. फॅशन, बँकिंग, शिक्षण, कलाक्षेत्र यासंबंधित वस्तू वा परफाॅर्मन्स इ.बाबत काम करणारे प्रगती करतील, पण सुरुवातीला काेणताही महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे.
 
नातीगाेती : हा आठवडा मानसिक व्याकुळतेमुळे थाेडासा त्रासदायक जाऊ शकताे, पण तुमच्यामध्ये एक वेगळाच जाेश राहणार असल्यामुळे नात्यात तुम्हाला निराश व्हावे लागणार नाही. दांपत्यजीवनात मधल्या काळात उत्तम संबंध राखू शकाल, पण त्यासाठी स्वत:च्या रागावर ताबा ठेवायला हवा.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमच्यामध्ये थाेडी मानसिक अस्वस्थता व शरीरात सुस्ती राहू शकते. पण व्यापकदृष्ट्या विचार करता तुमच्यातील उत्साहामुळे तुमच्या तब्येतीबाबत काेणतीही समस्या दिसून येत नाही. दैनंदिन जीवन बदलण्यासाठी जवळपासच्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात आपसातील विश्वास व पारदर्शकता टिकवून ठेवायला हवी. तसेच कागदपत्रांच्या देवघेवीत दक्षता बाळगा.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला संत्री वा माेसंबी अर्पण करावी. यामुळे संततीच्या जीवनातील बाधा दूर हाेतील व धनलाभ हाेईल.