मेष

    21-Feb-2021
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम रुपात फलदायक राहणार आहे. कमाईत वाढ हाेईल पण आता थाेडा खर्चही हाेण्यास सुरुवात हाेईल. बाॅसकडून स्वत:ची गाेष्ट साधून घेण्यात यशस्वी राहाल. तुमच्या कामात प्रगती हाेईल. काही नव्या क्षेत्रांत नवे प्रोजेक्ट मिळतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्याचा व्यवसायात सरकारी व कायदेशीर बाबींमुळे थाेडी अडचण येण्याची शक्यता आहे. कायदा पाळण्यासाठी एखादे दडपण येणार नाही याचे भान राखणे आवश्यक आहे. तसे आपण शिस्तीने व नियमानुसार पुढे जाल तर उत्तम ठरेल. तसेच थाेडा नम्रपणा ठेवणेही आवश्यक आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्यामध्ये भाेगविलासाची भावना अधिक राहील. दांपत्य जीवनात उत्तम साैख्य लाभू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला नात्यांबाबत तुमच्यामध्ये थाेडी मानसिक चंचलता व अस्वस्थता राहील.प्रवासाच्या नियाेजनात विलंब हाेईल वा अडथळा येईल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील, पण आठवड्याच्या मध्यात थाेडी मानसिक व्यग्रता राहील. श्वास, गॅस, जीभ, दात, खांदेदुखी, डाेळे, कान यासंबंधित त्रास असल्यास दक्षता बाळगावी. अखेरच्या दाेन दिवसांत वाहन सावकाश चालवावे. डाेळे मिटून काम केल्यास दुखापत संभवते.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग :पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात प्रवास आवश्यक असला तरी काम अर्धवट ठेवून जाऊ नये. प्रवासाची याेजना अनुभवींच्या सल्ल्याने बनवावी.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला शिंगाडा अर्पण करावा. यामुळे संततीला नाेकरी सहजतेने मिळेल. त्याचे वाद-खटले संपतील.