मीन

    21-Feb-2021
Total Views |
हा आठवडा काही प्रमाणात आव्हानात्मक असूनही तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही गृहस्थजीवनाला वेळ द्याल आणि जाेडीदाराच्या सर्व गरजा समजून घेत त्या पूर्ण कराल. तुम्ही खूप भावुक राहाल.नाहक चिंता करणे टाळायला हवे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्याचा व्यवसायात सरकारी व कायदेशीर बाबींमुळे थाेडी अडचण येण्याची शक्यता आहे. कायदा पाळण्यासाठी एखादे दडपण येणार नाही याचे भान राखणे आवश्यक आहे. तसे आपण शिस्तीने व नियमानुसार पुढे जाल तर उत्तम ठरेल. तसेच थाेडा नम्रपणा ठेवणेही आवश्यक आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या संबंधांत सुधारणा हाेईल. जर प्रेमात मतभेद वा गैरसमज उत्पन्न झाले असतील तर शांतपणे बसून ते साेडवायला हवेत. जुने गैरसमज दूर करून संबंध जास्त पारदर्शक बनवू शकता. मित्र आणि भावा- बहिणींसंबंधित नात्यात घनिष्टता वाढू शकते.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील, पण आठवड्याच्या मध्यात थाेडी मानसिक व्यग्रता राहील. श्वास, गॅस, जीभ, दात, खांदेदुखी, डाेळे, कान यासंबंधित त्रास असल्यास दक्षता बाळगावी. अखेरच्या दाेन दिवसांत वाहन सावकाश चालवावे. डाेळे मिटून काम केल्यास दुखापत संभवते.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. वाहनाचा वापर दक्षतेने करावा.
 
उपाय : या आठवड्यात पिंपळ वा बाभळीचे झाड ताेडू नये. काेणालाही माेफत माल देऊ नये. थाेरल्या भावाचा अपमान करू नये.