मकर

    21-Feb-2021
Total Views |
या आठवड्यात ग्रहांचे संयाेजन नात्यांच्या दृष्टीने अनुकूल दिसत नाही. त्यामुळे तुम्ही नात्यांबाबत जास्त दक्ष राहण्याची गरज आहे. वडिलाेपार्जित संपत्तीसंबंधित मुद्यांचे निवारण हाेण्यास थाेडा वेळ लागू शकताे. तुम्ही बाैद्धिक चर्चेत जास्त सावध राहायला हवे. स्वत:चेच खरे करीत बसू नये.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही कष्ट करण्यात जराही कमी पडू नये तसेच याेग्य नियाेजन करावे. सट्टाजुगारासारख्या शार्टकटमधून पैसा कमवू पाहाल तर स्वत:चाच पैसा गमावून बसाल. सरकारी नाेकरदार असाल तर आर्थिक लाभासाेबत बदली हाेण्याची शक्यता आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रियपात्राला भेटताना थाेडे लक्ष ठेवायला हवे.कारण विशेषकरून आपल्यामध्ये किरकाेळ गाेष्टींमुळे वाद, भांडण हाेऊन दुरावा वाढण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. विवाहितांचे संबंध सामान्य राहतील.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे आराेग्य उत्तम राहील. परंतु उत्तरार्धात थाेडे लक्ष द्यायला हवे. विशेषकरून अखेरच्या दाेन दिवसांत माेसमी समस्या तुम्हाला घेरू शकतात. शक्यतो जडान्नाऐवजी द्रवपदार्थ जास्त घ्यावेत.हिंडणे-फिरणे व साहसी कामासाठी आपण प्रेरित व्हाल.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात नशेच्या स्थितीत घरातील शांतता भंग हाेऊ शकते आणि घरातील व्यक्तींना मानसिक तणावाला सामाेर जावे लागू शकते. हे टाळायला हवे.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला नारळ अर्पण करावा. संततीच्या आराेग्यविषयक समस्या दूर हाेतील.