कुंभ

    21-Feb-2021
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी सर्वसाधारणपणे फलदायक राहणार आहे. दांपत्यजीवनात तणाव वाढू शकताे, पण प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे.दांपत्यजीवनात ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तुम्ही तणाव टाळायला हवा आणि संबंधात थाेडा गाेडवा आणायला हवा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमची व्यावसायिक प्रगती उत्तम हाेईल, पण काही अनिश्चिततेतून तुम्हाला जावे लागेल. सध्या काेणावरही डाेळे झाकून विश्वास करणे तुम्हाला महाग पडू शकते. नाेकरी व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हीे परिचितांची संख्या वाढवण्यास सुरुवात कराल.
 
नातीगाेती : या आठवड्यात खूप अनुकूलता असेल. विशिष्ट पात्रांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनून राहाल. तुमच्या दांपत्यजीवनात माधुर्य आणण्याचा तुम्ही उभयता प्रयत्न कराल. तुमची जाेडीदार तुम्हाला खूश ठेवण्यासाठी जास्त वेळ देईल. कुटुंबीयांसाेबत नात्यात थाेडा तणाव हाेण्याची शक्यता आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबत सुख-शांती असेल. तुम्ही हिंडण्या- फिरण्यात आणि स्वादिष्ट भाेजन करण्यात जास्त वेळ घालवाल. तुमची राेमांचक प्रवृत्तीही उत्तम राहिल्यामुळे एखाद्या राेमांचक प्रवासाला जाल. छाती वा फुफ्फुसाची समस्या असल्यास उत्तरार्धात थाेडे जपायला हवे.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात क्राेध व अहंकारामुळे तणाव निर्माण हाेणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आहार-व्यवहाराबाबत दक्ष राहावे .
 
उपाय : धार्मिक कामे करावीत. एखादा तीर्थस्थानाच्या यात्रेला जात असेल तर त्याला अडवू नये. आईकडून तांदूळ, चांदी घेऊन स्वत:कडे ठेवावे.