कर्क

    21-Feb-2021
Total Views |
या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी खूपच चांगली राहणार आहे. तुमची कमाई वाढलेली पाहून तुम्हाला खूप आनंद हाेणार आहे. तुमच्या कष्टाचे तुम्हाला उत्तम फळ मिळून तुम्हाला बढती मिळण्याचेही याेग दिसत आहेत. तुम्ही तुमच्याकडून काेणत्याही प्रकारची चूक हाेणार नाही याची दक्षता घ्यावी.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुमचे लक्ष प्राेफेशनल बाबींवर जास्त केंद्रित राहील. नाेकरीसाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांनी या दिशेने प्रयत्न करावेत.जरा उशीर झाला तरी यश नक्की मिळेल. नवी भागिदारी व नव्या करारबाबत थाेडे थांबावे. वाहन, रियल इस्टेट, शेती इ.साी प्रतिकूल काळ आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात तुम्हाला आंबट-गाेड अनुभव येतील.सुरुवात चांगली राहील, पण मध्यात तुमच्या मानसिक चंचलतेमुळे तुम्हाला तणावाची भीती सतावेल. वास्तविक तुमच्यात तणाव आणण्यास इतरच सक्रिय असतील. यासाठी थाेडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील. प्राेफेशनल बाबींत तुम्ही उत्साहाने व जाेमाने लक्ष देऊ शकाल. वास्तविक जादा कामाच्या ओझ्यामुळे आठवड्याच्या मध्यात थकवा जाणवून तुमचा स्वभाव चिडचिडा हाेऊ शकताे.अंतिम दाेन दिवसांत तुम्ही पुन्हा उत्साहाने काम करू लागाल.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमच्या विचारांना असहमती मिळू शकते यासाठी काेणतेही पाऊल जपून उचला.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला ऊस अर्पण करावा. यामुळे संततीचे भाग्य मजबूत हाेईल. विराेधकांचा पाडाव हाेईल.