कन्या

    21-Feb-2021
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा असेल. काहींना परदेशी जाण्यात यश लाभेल व तिथे जाऊन त्यांचे भाग्य उजळेल. तुमच्या खर्चांत अताेनात वाढ हाेईल. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकताे. यासाठी याेग्य पद्धतीने अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल माेर्चावर प्रगतीसाठी जास्त लक्ष केंद्रित कराल. यामध्येच तुमचा जास्त वेळ जाईल. कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा व शारीरिक तणावही जाणवू शकताे. शेती, बियाणे, केमिकल्स, औषधे, आयात-निर्यातीच्या कामात जास्त लाभ हाेण्याची शक्यता.
 
नातीगाेती : या आठवड्यात खास दाेस्तांकडे तुमचे लक्ष आकर्षित हाेईल.एखाद्यासाेबत पूर्वीपासून प्रेमसंबंध असतील तर सध्या तुम्हाला भेटण्याची इच्छा तीव्र राहील. विवाहितांनी जाेडीदाराच्या अहंकाराचा सामना करण्याची तयारी ठेवावी. कार्यस्थळी खास पात्रांशी जवळीक वाढेल.
 
आराेग्य : या आठवड्यात तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. विशेषकरून अ‍ॅसिडिटी, रक्ताभिसरणाच्या समस्या, गुप्तांगाच्या समस्या, त्वचेत अ‍ॅलर्जी इ.हाेण्याची दाट शक्यता आहे. पचनासंबंधित प्रश्नही तुम्हाला सतावू शकतात. या सर्व त्रासांवर वेळीच उपचार करून घ्यायला हवेत.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात कामात व निर्णय घेण्यात उशीर करू नये. तसेच पारदर्शकता ठेवावी.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला नारळ अर्पण करावा. संततीला अमाप धनप्राप्ती हाेईल. त्याची संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण हाेईल.