धनु

    21-Feb-2021
Total Views |
या आठवड्यात तुमची अनेक कामे पूर्ण हाेतील. तुम्ही तुमची राेजची कामे पूर्ण करण्यावरही लक्ष द्याल. यामुळे आव्हाने असूनही तुम्ही काही प्रमाणात उत्तम यश मिळवण्यात यशस्वी राहाल, पण तुमचे वरिष्ठ काही ना काही कारणावरून तुमच्या बाबत त्रस्त राहू शकतात. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवावे.
 
नाेकरी/व्यवसाय : व्यावसायिक विस्ताराची याेजना साकार हाेऊ शकते.सुरुवातीला आपण शेअरबाजार, दलाली व ट्रेडिंग इ. च्या कामात जास्त रुची घ्याल.नाेकरदार जाॅब बदलण्याचा विचार करीत असतील तर उत्तम संधी मिळू शकते.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्यामध्ये संभाषण वाढेल. डेटिंगची सुरुवात करण्यासाठी वा एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित हाेऊन प्रपाेज करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तशी सर्व स्थितींमध्ये आणि विशेषकरून दांपत्यजीवनात तुम्हाला नात्यात पारदर्शकता व वागण्यात चांगुलपणा आणायला हवा.
 
आराेग्य : या आठवड्यात विशेषकरून स्नायूंच्या समस्या, त्वचेत जळजळ हाेत असल्यास लक्ष द्यावे. सध्या डाेकेदुखी वाढू शकते. ज्यांना शारीरिक उष्णतेची समस्या असेल त्यांनी जास्त पाणी व द्रवपदार्थ घेण्याची गरज आहे. मित्र वा कुटुंबीयांसाेबत फिरायला गेल्यास तन-मन प्रफुल्लित हाेईल.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात घरच्यांसाेबतच बाहेरच्यांशीही वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा.
 
उपाय : या आठवड्यात सूर्यदेवाला ऊस अर्पण करावा. यामुळे तुमच्या संततीच्या शिक्षण व एकाग्रतेत अद्भुत सुधारणा हाेईल