सडनी, 1 फेब्रुवारी (वि.प्र.) : ऑस्ट्रेलियामधील शील्स ज्वेलर्सने 90 लाख रुपये किमतीचा गाॅगल तयार केला आहे. या गाॅगलला (सनग्लास) पन्ना नावाच्या रत्नापासून तयार केलेले लेन्स आणि 18 कॅरेट साेन्याची फ्रेम बसविली आहे. त्यामुळे हा गाॅगल डाेळ्यावर लावला की, सर्वच हिरवेगार दिसते.असे म्हणतात की, राेमचा सम्राट निराे त्यावेळी आपल्या मनाेरंजनासाठी आपल्याच सैनिकांमध्ये लढाई करवित असे. निराे ही लढाई हिरव्या पन्ना हिऱ्यातून पाहत असे.याचाच आधार घेऊन शील्स ज्वेलर्सने हा गाॅगल तयार केल्याचे शील्स ज्वेलर्सचे एम.डी. अल्बर्ट बेसीमन यांनी सांगितले. ते त्यांना हवे तसे पन्ना रत्न मिळावे यासाठी तब्बल पाच वर्षे फिरले व तब्बल तीन महिन्यांत हा 90 लाखांचा गाॅगल तयार झाला.