खाद्यतेलात भेसळ करणाऱ्यांचे परवाने रद्द करा - यड्रावकरांचे निर्देश

    12-Feb-2021
Total Views |

sw_1  H x W: 0
 
मुंबई, 11 फेब्रुवारी (आ.प्र.) : खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांविराेधात अन्न व औषध विभागाची माेहीम अधिक तीव्र करण्याबराेबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.राज्यात गेल्या काही दिवसांत खाद्यतेलात भेसळ हाेत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाची महत्त्वपूर्ण बैठक यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खाद्यतेलातील भेसळ राेखण्यासाठी उपाययाेजना, भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती, भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर छापे टाकून कडक कारवाई करावी. तसेच, खाद्यतेलात वारंवार भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे अन्नपरवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश यड्रावकर यांनी दिले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व काेकण विभागाचा आढावा त्यांनी घेतला. खाद्यतेला बराेबरच प्रतिबंधित अन्नपदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविषयी विभागाने सतर्क राहून भेसळ करणाऱ्यांविराेधात कडक कारवाई करावी.या माध्यमातून नागरिकांच्या आराेग्याचा दर्जा सुधारण्यास मदत हाेईल, असे त्यांनी सांगितले. या कारवायांबाबतचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.