नवीन वैद्यकीय महाविद्यालय नाशिकमध्ये सुरू करणार

    12-Feb-2021
Total Views |

cf_1  H x W: 0
 
नाशिक, 11 फेब्रुवारी (आ.प्र.) : येथे 100 विद्यार्थी प्रवेशक्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्नित या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास, तसेच त्यात 15 विषयांत एकूण 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. हे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय आराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त पूर्णत: स्वायत्त संस्था असणार आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयाेगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा आराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.