पैसा म्हणजे खूप काही, मात्र सर्वस्व नव्हे

    01-Dec-2021
Total Views |
 
 
 
मेहनत आणि जिद्दीच्या जाेरावर बिकट स्थितीतून मार्ग काढता येताे
 

solution_1  H x 
 
संध्यानंद.काॅम
 
काेराेना महामारीच्या या काळाने सगळ्यांना एकदम जमिनीवर आणि समानतेच्या पातळीवर आणले आहे. पैसे असलेले आणि नसलेलेसुद्धा साथीबराेबर झुंजत आहेत आणि केवळ पैसा म्हणजे सर्वस्व नसल्याचे लक्षात आले आहे.पैशांपेक्षा आता आराेग्य महत्त्वाचे असल्याचा साक्षात्कार झाला आहे. जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा असल्याबाबत शंका नसली, तरी केवळ पैसा म्हणजे सर्व काही नाही हेही आपल्याला समजले आहे. एका माेठ्या शहराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून एक भिक्षेकरी लाेकांकडून मदतीची अपेक्षा करत असे. रात्रीपर्यंत भीक मागूनही त्याच्याकडे एक किंवा दाेन रुपये जमत असत आणि त्यातून त्याला जेमतेम एक पाेळी आणि चहाचा एक कप घेऊन पाेट भरावे लागत असे.
 
एक दिवस त्याच्याकडे एक बुद्धिमान माणूस आला आणि म्हणाला, ‘तू भीक मागून दिवस वाया कशाला घालवताे आहेस? तू बसलेल्या जागी खाेदले असते, तर एखादी माैल्यवान गाेष्ट तुला मिळाली असती.’ त्या भिक्षेकऱ्याने त्या व्यक्तीचा सल्ला मानला आणि झाडाखाली खाेदायला सुरुवात केली.तेथे त्याला साेन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी सापडली तेव्हा त्याला धक्काच बसला.एवढ्या संपत्तीवर मी बसल्याची जाणीव मला झाली असती, तर मी कधीच माझे दु:ख दूर करू शकलाे असताे, असा विचार त्याच्या मनात आला.आपली अवस्था अशीच असते. आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही याची जाणीवच जास्त हाेत राहते. तेच आर्थिक स्थितीबाबत.कठाेर मेहनत करून केलेल्या बचतीमुळे आपली आर्थिक स्थिती चांगली हाेईल असा विचार करून आपण तसे करताे. पण काही वेळा अंदाज चुकतात आणि आर्थिक समस्या सामाेऱ्य येतात.
 
अशा स्थितीत आपल्याला पैशांचे माेल समजते. मेहनतीशिवाय पैसा मिळत नसल्याचे आपल्याला सांगितले जात असल्यामुळे पैसा नसेल, तर स्थिती चमत्कारिक हाेते.पण विपरीत स्थिती असली, तरी मेहनत आणि जिद्दीच्या जाेरावर त्यातून मार्ग काढता येताे हे आपण विसरताे. जगात येताना आपल्याला अनेक क्षमता आणि काैशल्यांचे वरदान मिळालेले असते. त्यांचा पुरेपूर वापर केला, तर मार्ग काढणे कठीण नाही. आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष केंद्रित केले, तर यश दूर नसते. आर्थिक समस्या सगळ्यांनाच येत असतात. फरक असताे त्यावर मात करण्याच्या दृष्टिकाेनात. संकट कधी कायम राहत नाही, पण त्यावर मार्ग काढावा लागताे. आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव असेल, तर तेही श्नय हाेते. आर्थिक अडचणींबराेबर सामना करतानाच आपल्या क्षमता आपल्याला कळतात आणि त्यातून मार्गसुद्धा सापडताे.