सिंधुदुर्गात आढळला दुर्मीळ पाेवळा साप

01 Dec 2021 14:38:55
 
 
 

snake_1  H x W: 
 
जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात अतिशय दुर्मीळ असलेला साप आढळला. सापाची दुर्मीळ प्रजाती असलेला क्रॅस्टाेस काेरल स्नेक म्हणजेच ‘पाेवळा’ साप असं याचं नाव आहे. तुळस या गावात हा साप आढळला.हा साप अत्यंत विषारी असताे.हा साप प्रामुख्याने दगड आणि पालापाचाेल्यांखाली आढळताे. गांडूळ, लहान बेडूक, सरडे आणि पाल त्याचे खाद्य आहे. डाेक्यावर केशरी रंगाचा पट्टा हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
 
सिंधुदुर्गात पाेवळा सापाच्या प्रजातीमध्ये 2 प्रकारच्या प्रजाती आहेत. यामध्ये स्ट्राइप काेरल स्नेक आणि क्रॅस्टाेज काेरल स्नेक अशा 2 प्रजाती आहेत. क्रॅस्टाेज काेरल स्नेक हा फार दुर्मीळ आहे. हा साप गाेव्यापासून ते साताऱ्यापर्यंत आढळताे; पण प्रत्यक्षात ताे फार कमी दिसताे.त्यामुळे ताे दुर्मीळ मानला जाताे. हा साप आढळल्याने सिंधुदुर्गाची म्हणा किंवा पश्चिम घाटाची जैवविवधता अधाेरिखत करणारी बाब आहे.
Powered By Sangraha 9.0