महागाईची भीती असूनही भारतीयांचे ‘हाेऊ देत खर्च’ धाेरण

    01-Dec-2021
Total Views |
 
 
 

shopping_1  H x 
लंडनच्या ऑलिंपिक पार्कमध्ये नाेव्हेंबर 2021 मध्ये केलेला जागतिक विक्रम ‘डेलाेट्टी टच ताेहमेत्सू इंडिया’च्या सर्वेक्षणातील माहिती; विमान प्रवास, करमणूक आणि वाहनखरेदीस प्राधान्य जागतिक महागाईची भीती असतानाही भारतीयांची खर्चाची तयारी असल्याचे ‘डेलाेट्टी टच ताेहमेत्सू इंडिया’च्या एका सर्वेक्षणात आढळले आहे. पर्सनल केअर, कपडे, वाहन खरेदी आणि सुटीसाठी विमान प्रवासासारख्या खर्चांसाठी भारतीय नागरिक तयार असल्याचे त्यात दिसले.भारतीय लाेक केवळ खर्चच नव्हे, तर बचतीसही प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणाला प्रतिसाद दिलेल्यांपैकी 58 टक्के लाेक बचतीला पसंती देणारे आहेत. मात्र, त्याच वेळी काही नव्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा असलेले लाेक पन्नास टक्के आहेत. त्यातही प्रवासासाठी भरपूर खर्च करण्याची तयारी असलेले लाेक जास्त आहेत. आगामी तीन वर्षांत आपली आर्थिक स्थिती चांगली राहील अशी 77 टक्के प्रतिसादकर्त्यांना अपेक्षा आहे.
 
काेराेनाचा कमी हाेत असलेला प्रभाव आणि उपलब्ध हाेत असलेल्या नव्या राेजगारांमुळे त्यांना ही अपेक्षा वाटत असल्याचे सर्वेक्षणात दिसले.‘वेव्ह 24’ या नावाने ‘डेलाेट्टी टच ताेहमेत्सू इंडिया’ने या सर्वेक्षणातील माहितीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक पातळीवर ग्राहकांची मानसिकता काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले हाेते. 23 देशांतील प्रत्येकी एक हजार ग्राहकांची ऑनलाइन पाहणी या सर्वेक्षणासाठी करण्यात आली हाेती ‘चलनवाढीबाबत 74 टक्के भारतीयांना चिंता वाटत असली, तरी 85 टक्के प्रतिसादकर्त्यांनी या महिन्यात आलिशान प्रवासावर खर्च करण्याचा निर्णय केला आहे. प्रत्यक्ष संपर्क सुरू करण्यास 71 टक्के लाेक अनुकूल आहेत, तर आता रेस्टाॅरंटमध्ये जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे सुरक्षित असल्याचे 68 टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते,’ असे या अहवालात म्हटले आहे.
 
भारतीयांबराेबरच जगातील अन्य देशांतील नागरिकांनाही चलनवाढीची चिंता वाटते. त्यात दक्षिण आफ्रिका (86 टक्के), स्पेन (85 टक्के), पाेलंड (84 टक्के), ब्राझील (80 टक्के), कॅनडा (74 टक्के), ब्रिटन (72 टक्के) आणि अमेरिका (71 टक्के) यांचा समावेश आहे. भविष्याबाबत भारतीय लाेक सर्वांत आशावादी असून, आगामी तीन वर्षांत आपली आर्थिक स्थिती जास्त सुधारेल अशी अपेक्षा 77 टक्के प्रतिसादकर्त्यांनी व्यक्त केली आहे.आगामी चार आठवड्यांत प्रवासाची 85 ट्न्नयांची याेजना आहे, तर येत्या सहा महिन्यांत नवे वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांचे प्रमाण 74 टक्के असल्याचे हा अहवाल म्हणताे. पर्सनल केअर, प्रवास, करमणूक आणि कपड्यांसाठी खर्च करण्यास सर्वाधिक 14 टक्के लाेक तयार आहेत.त्यापाठाेपाठ इले्नट्राॅनिक डिव्हाइस आणि घरातील फर्निचर (11 टक्के) यांचा क्रमांक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.