देशभरातून धावणार रामपथ रेल्वे; पुणे-अयाेध्या-पुणे विशेष रेल्वेगाडीस प्रारंभ

01 Dec 2021 15:00:54
 
 

railway_1  H x  
 
प्रभू रामाची राजधानी असणाऱ्या अयाेध्येत देशातील नागरिकांना कमी खर्चात जाता यावे, यासाठी देशभरातील विविध ठिकाणांहून रामपथ विशेष रेल्वे सुरू करण्यात येतील, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे दिली.दानवे यांनी पुणे-अयाेध्या-पुणे या रामपथ यात्रा स्पेशल रेल्वेला ऑनलाइन माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या वेळी दानवे बाेलत हाेते. महापाैर मुरलीधर माेहाेळ, आमदार सुनील कांबळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा आदी या वेळी उपस्थित हाेते. मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहाेटी आणि आयआरसीटीच्या अध्यक्ष रजनी हत्रसिजा वेबलिंकद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाल्या हाेत्या.
 
देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी देखाे अपना देश ही माेहीम सुरू करण्यात आली आहे. रामपथ यात्रा रेल्वे रामायण सर्किटचा एक भाग असून, प्रभू रामाच्या प्रवासातील महत्त्वाच्या ठिकाणांना जाेडते. देशातील अनेक रामभक्तांना अयाेध्येत जाण्याची इच्छा असते.प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नंदीग्राम, वाराणसी, प्रयाग, शृंगावेरपूर आणि चित्रकूट शहरांत जाण्याची इच्छा पूर्ण हाेण्यासाठी ही रामपथ विशेष रेल्वे सुरू झाली आहे, असे दानवे यांनी सांगितले. ही रेल्वे सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीच्या प्रयत्नांचे दानवे यांनी काैतुक केले.
Powered By Sangraha 9.0