फिलीपची पाेगाे स्टिक वापरून पाच कारवरून जंप

    01-Dec-2021
Total Views |
 
 
लंडनच्या ऑलिंपिक पार्कमध्ये नाेव्हेंबर 2021 मध्ये केलेला जागतिक विक्रम
 

philip_1  H x W 
 
फिलीप दहा वर्षांपासून रेकाॅर्ड बनविण्यासाठी प्रॅ्निटस करीत हाेता. शेवटी त्याला यश मिळाले आणि त्याने आधीचे वर्ल्ड रेकाॅर्ड ताेडले.21 वर्षीय अमेरिकी युवक टेलर फिलीपने पाेगाे स्टिकचा वापर करून 5 माेठ्या इले्निट्रक कारना सलग उडी मारून पार केले. नाेव्हेंबर 2021 मध्ये लंडनच्या ऑलिंपिक पार्कमध्ये हे रेकाॅर्ड बनविले.6.56 फूट उंची आणि 5.24 फूट रुंदी असणाऱ्या 5 कारवरून सलग उडी मारून आव्हान पूर्ण केले. त्याच्यासमाेर आव्हान हाेते की, त्याला लंडनच्या पाच कॅब कारवरून उडी मारायची हाेती. हे वर्ल्ड रेकाॅर्ड बनविण्याआधी फिलीप खूप नर्व्हस हाेता. कारण त्याला बॅलन्स पूर्णपणे कायम ठेवायचा हाेता. ते खूप आव्हानात्मक हाेते. त्याने सांगितले की, जेव्हा ताे जंप करत हाेता, तेव्हा सुलभपणे हे आव्हान पार केले. त्यासाठी ताे दहा वर्षे प्रॅ्निटस करत हाेता. याच्याआधी डाल्टन स्मिथ नावाच्या व्य्नतीच्या नावावर 4 कारवरून पाेगाे स्टिकने सतत जंप करण्याचे रेकाॅर्ड हाेते. हे रेकाॅर्ड त्याने न्यूयाॅर्कमध्ये वर्ष 2019 मध्ये बनविले हाेते.