माऊली संजीवन समाधी सप्तशतकाेत्तर राैप्यमहाेत्सवानिमित्त बाेधचिन्हांचे अनावरण

    01-Dec-2021
Total Views |
 
 

mauli_1  H x W: 
 
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकाेत्तर राैप्यमहाेत्सवी वर्षानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्या हस्ते बाेधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.पाेलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे, प्रमुख विश्वस्त याेगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बाळासाहेब चाेपदार, बाळासाहेब अरफळकर, याेगी निरंजन नाथ, उमेश बागडे आदी या वेळी उपस्थित हाेते. राज्यपालांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थळाचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार शाश्वत असून, समाजाला या विचारांची आज आवश्यकता आहे. मानव कल्याणसाठी या विचारांचा संपूर्ण विश्वात प्रसार व्हावा, असे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी मंदिर परिसराला भेट देऊन माहिती घेतली.