काेंढव्यात महावितरण कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; फाैजदारी गुन्हा दाखल

    01-Dec-2021
Total Views |
 
 
 

electricity_1   
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका आराेपीविरुद्ध काेंढवा पाेलिस ठाण्यात फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महावितरणच्या रास्ता पेठ विभागांतर्गत काेंढवा शाखा कार्यालयाचे कर्मचारी दशरथ मुंडे सहकाऱ्यांसमवेत शाह हाईट्स, भाग्याेदयनगर मधील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करत हाेते.
 
या वेळी दाेन थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करून त्यांनी वीजमीटर ताब्यात घेतले असता आराेपी इरशाद शाह या व्यक्तीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.तसेच, ताब्यात घेतलेले मीटर त्याने परत घेतले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आराेपीविरुद्ध काेंढवा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.