आजाेबांनी घेतला अमेरिकेतील 8 हजार चायनीज हाॅटेलांमध्ये आस्वाद

    01-Dec-2021
Total Views |
 
 
 

chineese_1  H x 
अमेरिकेतील अनेक लाेकांना चायनीज पदार्थ आवडतात. मात्र, डेव्हिड आर चॅन यांच्यासाठी चायनीज पदार्थांचं वेगळंच महत्त्व आहे.
लाॅस एंजल्समध्ये राहणारे 72 वर्षीय चॅन हे माजी करसल्लागार वकील आहेत. त्यांनी आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास 8 हजार चायनीज रेस्तराँमध्ये पदार्थांचा आस्वाद घेतला असून, हा सिलसिला सुरूच असल्याचा त्यांचा दावा आहे.अनेक दशकांपासून त्यांनी यापैकी प्रत्येक रेस्तराॅमधील पदार्थांसंदर्भातील माहिती गाेळा केली. त्याचबराेबर हजाराे रेस्तराँचे बिझनेस कार्ड्स आणि मेन्यूचाही त्यात समावेश आहे. आपण जर राेज एका चायनीज रेस्तराॅला भेट दिली, तर त्यांच्या सध्याच्या आकड्यांपर्यंत म्हणजे 7812 रेस्तराँचा आकडा गाठायला आपल्याला 20 वर्षे लागतील.
या 5 वर्षांच्या काळात त्यांनी पायनॅपल बनपासून ते डुकराचे मांस, चिकन फीट (काेंबडीचे पाय), टी स्माेक्ड डक (बदक) अशा विविधफ पदार्थांची चव चाखली. चॅन हे राेज त्यांनी जमवलेली माहिती साेशल मीडियावरही शेअर करतात.चायनीज-अमेरिकन म्हणून स्वतःचा शाेध घेण्यासाठी चॅन यांच्या या खाद्यप्रवासाची सुरुवात झाली हाेती; पण अनेक वर्षांच्या या सातत्यामुळे चॅन हे अमेरिकेतील चिनी खाद्य पदार्थांबराेबरच चिनी संस्कृतीच्या बदलाचे साक्षीदारही बनले आहेत. ते चिनी पदार्थांबाबतचे तज्ज्ञ मानले जातात. या पदार्थांची अमेरिकेत कशी वाटचाल झाली, याचे ते साक्षीदार आहेत.