वाचनाचा संबंध डाेळ्यांबराेबर मनाशी येताे

    01-Dec-2021
Total Views |
 
 
 
 
Reading_1  H x
 
 
वाचन हा ज्ञान मिळवण्याचा, व्यक्तीमत्त्वाचा विकास हाेण्याचा व मनाेरंजनाचा एक मार्ग आहे. वाचनाचा संबंध डाेळे व मन यांच्याशी येताे.वाचन करताना डाेळ्यांना काही गाेष्टींचे अडथळे येतात, ते म्हणजे अंधार, झगमगता प्रकाश, डाेळ्यांवर ताण पडणारी अक्षरं यामुळे डाेळ्यांवर वाईट परिणाम हाेताे. काहीजण चष्म्याशिवाय वाचूच शकत नाही; परंतु ज्यांची डाेळ्यांविषयी कसलीही तक्रार नाही ते मात्र कुठेही, कसेही वाचन करू शकतात. वाचताना डाेळे अक्षरांकड वळवावे लागतात. डाेळ्यांची दिशा मात्र मन ठरवते. पूर्वी वाचक मन लावून वाचत असे.समग्र विवेकानंद, समग्र सावरकर, गांधी, टिळक असे वाचन ते करीत असत.
 
वाचकांची ही पिढी मागे पडली, असे दिसते. आता माणसे अन्य गाेष्टींमध्ये गुंतली आहेत.काॅम्प्युटर, माेबाइलमुळे वाचन मागे पडत चालले आहे. इथून पुढच्या काळात काही अपवाद साेडलास पूर्ण ग्रंथ वाचले जाण्याची श्नयता कमी आहे.विषयानुसार किंवा संशाेधनासाठी असलेले वाचन फक्त केले जाईल.ग्रंथप्रदर्शने भरवली जातात. वाचनसंस्कृतीचे महत्त्व पटवून दिले जाते.वाचनाचं महत्त्व वाचकाला कळले पाहिजे. मनाेरंजन, ज्ञानसंपादन, भाषाविकास, जीवनदर्शन, सृष्टीची ओळख, असे अनेक हेतू असू शकतात.त्यामुळे आधी वाचनाचे उद्दिष्ट निश्चित करावे व त्यानुसार वाचन करावे.