आयएनएस शिवाजीत उत्साहात अर्धमॅरेथाॅन

    01-Dec-2021
Total Views |
 
 
 
INS_1  H x W: 0
 
नाैदलाची एक महत्त्वाची संस्था असलेल्या आयएनएस शिवाजी संस्थेत नाैदल सप्ताहानिमित्त 21 कि.मी.ची अर्धमॅरेथाॅन, तसेच दहा व पाच कि.मी.अंतराची मॅरेथाॅन आयाेजिण्यात आली हाेती. या स्पर्धेत सहाशे स्पर्धक सहभागी झाले हाेते. या स्पर्धांत लष्कराच्या तिन्ही दलांसह नागरिक व मुलेही सहभागी झाली हाेती.नाैदलासह लष्करी सेवेबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू हाेता. आयएनएस शिवाजीच्या मुख्यालयापासून या स्पर्धेला प्रारंभ झाला.अर्धमॅरेथाॅनचा मार्ग अधिक खडतर हाेता. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्यांना संस्थेचे प्रमुख कमाेडाेर अरविंद रावळ यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.या स्पर्धेत सहभागी झालेल्यांचेही कमाेडाेर रावळ यांनी काैतुक केले.