घरात राहूनही फिटनेस राखणे शक्य

    01-Dec-2021
Total Views |
 

fitness_1  H x  
 
 
निराेगी राहण्यासाठी आहाराची निवड खूप महत्त्वाची ठरते. आहारात पालेभाज्यांचा समावेश अवश्य करा.पालेभाज्या आराेग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.भाज्यांमध्ये आढळणारेफायबर, लाेह, जीवनसत्त्व फॅट्स कमी करण्यासाठी सहायक ठरतात. पालेभाज्यांमध्येफायटाेकेमिकल्स असतात, जी पचनयंत्रणेसाठी आणि यकृताला निराेगी ठेवण्यासाठीफायदेशीर ठरतात
  
फिटनेससाठी जिममध्ये जाणे आवश्यक नाही. संतुलित आहार, व्यायाम आणि आजीच्या कानमंत्रांद्वारे आपण घरातहीफिटनेस मिळवू शकताे. आजफिटनेसच्या बाबतीत गृहिणी खूप सजग आहेत. त्यांच्यामध्ये सध्याफिट आहे, तर हिट आहे ही स्लाेगन लाेकप्रिय आहे. त्या काम, स्वयंपाकघर, कुटुंब यामध्ये व्यग्र असूनसुद्धा संतुलित आहार, व्यायाम, याेगा, मेडिटेशनच्या माध्यमातून बारीक दिसण्यासाठी प्रयत्न करतात. वेळेच्या कमतरतेमुळे त्या जिममध्ये जाण्याऐवजी घरातच काही उपाययाेजना करतात. याबाबतीत तज्ज्ञ काय म्हणतात, त्यावर एक प्रकाशझाेत.
 
हिरवं उत्तम
 
निराेगीराहण्यासाठी आहाराची निवड महत्त्वाची ठरते.आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. या आराेग्यासाठीफायदेशीर ठरतात. भाज्यांमध्ये आढळणारेफायबर, लाेह आणि जीवनसत्त्व फॅट्स कमी करण्यासाठी सहायक ठरतात.पालेभाज्यांमध्येफायटाेकेमिकल्स असतात आणि ही पचनयंत्रणा आणि यकृतासाठीफायदेशीर ठरतात.
 
झाेप आणि एक दिवसाचा उपवास
 
भलेही तुम्ही नास्तिक आहात, तरी आठवड्यातून एक दिवस उपवास करणं शरीरासाठीफायदेशीर ठरते. उपवास करणं आणि वेळेवर झाेपणं हा एक साॅलिड कानमंत्र आहे.फिटनेससाठी हा मंत्र अतिशय सहायक मानला जाताे.दिवसातून एकदा जेवणाऐवजी फळं, ज्यूस, सलाड यांचं सेवन अवश्य करा. व्यग्र जीवनात वेळेवर झाेपणं कठीण आहे. तरीही प्रयत्न करा की, उशिरापर्यंत टीव्ही बघणे किंवा पार्टी करणे याऐवजी वेळेवर झाेपण्यास प्राधान्य द्या. हे शारीरिक आणि मानसिक दाेन्ही स्थितींसाठी उत्तम आहे. आठ तासांची पूर्ण झाेप थकवा, वेदना आणि आळस यापासून मु्नती देण्यासाठी सहायक ठरते. शिवाय दुसऱ्या दिवशीफिट ठेवते.
 
व्यायामाचेफायदे
 
बाहेर जाऊ शकत नसाल, तर घरातच तुम्ही व्यायाम करू शकता. व्यायाम करण्याने घामाच्या माध्यमातून शरीरातील टाॅक्सिन निघून जातात आणि शरीरात ऑक्सिजन अधिक प्रमाणात शाेषून घेतला जाताे. मुलांबराेबर गच्चीवर काही वेळ खेळा, उड्या मारा, नृत्य करा किंवा वेगाने चाला. याेग आणि मेडिटेशनही तणावमु्नत राहण्यासाठी खूप मदत करते. व्यायाम करण्यास कंटाळा येत असल्यास मुलांना किंवा पाळीव प्राण्याला बराेबर घ्या. जेव्हा तुम्ही घराच्या लाॅन किंवा जवळच्या बागेत यांच्याबराेबर असाल, तेव्हा निश्चितच हसण्यासाठी आणि पळण्यासाठी प्रेरणा मिळेल. नियमित सुरू झालेला हा क्रम जिमऐवजी घरीचफिट राहण्यासाठी सहायक ठरेल.
 
हवामान अनुकूल
 
सध्याच्या दिवसांत केलेला व्यायाम शरीरासाठीफायदेशीर ठरताे. तुम्ही सकाळी उठून जिममध्ये जाऊनच व्यायाम करायला हवा, असं काही नाही. घरात याेगा, मुलांबराेबर खेळूनही तुम्हीफिट राहू शकता.
 
पाणी अनमाेल
 
तज्ज्ञांच्या मते, शरीरात पाण्याची कमतरता हाेऊ देऊ नका. शरीर एकदाही डिहायड्रेट झाले, तरी त्यामधील पाेषक घटकांचं प्रमाण कमी हाेते. यामुळे साैंदर्य आणि चमक यामध्येही घट हाेते. पाण्याशिवाय काकडी, कलिंगड, टाेमॅटाे आणि हंगामी फळं खा. यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि खनिजं असतात.यामध्ये असणारे पाणी डिटाॅक्स करते. मिनरल्स सिस्टिमला हेल्दी बनवतात.
 
मसाजची मजा
फिजिओथेरपिस्ट स्टैनली ब्राऊन म्हणतात, की आहाराबराेबरचफिट राहण्यासाठी मसाज आवश्यक आहे. स्पामध्ये जाण्याऐवजी आठवड्यातून एकदा घरीच मसाजसाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. याद्वारे मान, हात, पाय आणि खांद्यांना मालीश करा. हे ते अवयव आहेत ज्यावर अधिक जास्त ताण येताे, पण लक्षात ठेवा, मसाज केल्यानंतर गरम पाण्याने अंघाेळ करणे आवश्यक आहे.