‘ओमिक्राॅन’ राेखण्यासाठी युद्धपातळीवर उपाय याेजावेत

    01-Dec-2021
Total Views |
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश : नव्या व्हेरियंटबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त
 
 
CM_1  H x W: 0
 
ओमिक्राॅन या काेराेनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग राेखण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली.देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी, तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शाेधणे साेपे जाईल. त्यामुळे संसर्ग राेखणेही साेपे हाेईल.ओमिक्राॅनचा प्रसार राेखण्यासाठी युद्धपातळीवर शक्य त्या सर्व उपाययाेजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल ओमिक्राॅनचे 50पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जीन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्राने 12 देशांतल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगाेदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून, येथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे.
 
तसेच, सात दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक केले आहे.परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमानसेवेने किंवा रस्ते आणि रेल्वे मार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार, हा सध्याचा प्रश्न आहे. पंतप्रधानांन यासंदर्भात अवगत करण्यात यावे, यावर बैठकीत चर्चा झाली.दरम्यान, ओमिक्राॅनची लागण हाेण्याची गती सध्याच्या व्हेरियंटपेक्षा 5 पटीने जास्त आहे, अशी माहिती राजेश टाेपे यांनी मुख्यमंत्र्यांसाेबत झालेल्या बैठकीनंतर दिली. औरंगाबाद, मुंबई, नागपूर पुणे या विमानतळांवरही प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जातील, असेही टाेपे यांनी सांगितले. ओमिक्राॅनचा प्रसार राेखण्यासाठी युद्धपातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययाेजना करा. टाळेबंदी नकाे असेल, तर सर्व बंधने पाळावी लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.