महत्त्वाच्या कामांबाबत चालढकलीची सवय नकाेच

    30-Nov-2021
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

work_1  H x W:  
 
जगण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागते.त्याचे स्वरूप बाैद्धिक असेल अथवा शारीरिक श्रमांचे; पण ते करावे लागणे तर अपरिहार्य आहे. काम सुरू केल्यावर ते पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा येते. त्यासाठी पाळावे लागते वेळेचे बंधन आणि तेथेच अडते. यामागे असते चालढकलीची सवय. काम हाती घेण्यापासून त्याची सुरुवात हाेते आणि शेवट पूर्णत्वापर्यंत जाताे. याचा परिणाम म्हणजे एकही काम वेळेत पूर्ण न हाेणे. मग ते करण्यासाठी वेळेबराेबर शर्यत सुरू हाेते आणि त्या घाईत कामात चुका हाेण्याची श्नयता वाढते. म्हणजेच, ही सवय शेवटी त्रासदायक ठरते हे तुमच्या लक्षात आले असेल.
 
हे प्रश्न स्वत:ला विचारा :
1) काेणतेही काम सुरू करण्यापूर्वी, हे काम करायला अजून खूप वेळ आहे, थाेड्या वेळाने करू असा विचार तुम्ही करता का? 2) सकाळी लवकर उठण्यासाठी 15-15 मिनिटांच्या अंतराने अलार्म सेट करता का?
3) आधीच करायला हवे हाेते; पण ते केले नाही असे एखादे काम तुम्हाला ऐनवेळी आठवते का?
4) तुम्हाला एखाद्या ठिकाणी वेळेवर पाेहचणे आवश्यक असूनही तुम्ही उशिरा पाेहचलात.पण, उशीर झालेला मी एकटा नाही, आणखीही लाेक असे आहेत असा विचार करून तुम्ही निश्चिंत हाेता का?
5) एखादे काम पूर्ण करण्याची निश्चित वेळ (डेडलाइन) जवळ येऊ लागल्यावर हे काम त्या वेळेत पूर्ण हाेणार नाही अशी भीती तुम्हाला वाटायला लागते का? या पाच प्रश्नांचा नीट विचार करा. यातील तीन प्रश्नांची उत्तरे हाेकारार्थी असतील, तर तुम्हाला चालढकलीची सवय झाली असल्याचे स्पष्ट हाेईल.
 
चालढकल म्हणजे काय? : काम अथवा काही करणे टाळणे ही एक सवय आहे. एखादे काम वेळेत करण्याऐवजी ते आपण नकळत पुढे ढकलताे. नंतर करू, आज-उद्या करू, हाेऊन जाईल अशी वा्नये त्याची निदर्शक आहेत. याला दीर्घसूत्रता असेही म्हणतात आणि ती बहुसंख्य लाेकांमध्ये आढळते. त्यातून येते टाळाटाळीची प्रवृत्ती.
 
चालढकलीत वाईट काय? : आपले महत्त्वाचे काम यातून पुढे ढकलले जात असल्यामुळे ही सवय वाईट आहे. काम किंवा जबाबदारी पार पाडण्याऐवजी आपण झाेप, आराम आणि आळसाकडे आकर्षित हाेताे. काही काळ यातून बरे वाटले, तरी दीर्घकालीन विचार केला तर ही सवय घातक ठरते. काही करणे टाळणे साेपे असते आणि काही केलेच नाही तर काही अडचण येण्याचा प्रश्न नसताे. पण यामागे एक ठाेस कारण असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. आपल्या मेंदूत ‘लिम्बिक सिस्टिम’ नावाचा एक भाग असताे, आणि ताे आपले व्यवहार तसेच भावनात्मक प्रतिक्रियांबराेबर संबंधित असताे.
 
‘प्रिफंटल काॅर्टे्नस’ हा मेंदूतील दुसरा भाग आपल्याला उद्दिष्टे ठरविणे आणि त्यांच्या पूर्ततेसाठी मदत करताे. याेजना तयार करणे आणि निर्णयप्रक्रियेतही याचा सहभाग असताे. या दाेन्ही भागांमध्ये ओढाताण हाेऊन ‘प्रिफंटल काॅर्टे्नस’ दुर्बल ठरला आणि ‘लिम्बिक सिस्टिम’ प्रभावी ठरली, तर आपण दीर्घसूत्री हाेताे. म्हणजेच, चालढकल सुरू करताे, असे तज्ज्ञ सांगतात.
अशा लाेकांमध्ये मानसिक तणाव खूप असताे आणि त्यांचे जीवनही गाेंधळाचे असते.
 
चालढकलीचे परिणाम : चालढकलीची सवय दीर्घकाळापर्यंत राहिली, तर एक दिवस असा येईल, की तेव्हा तुमच्याकडून काम करून घेणे सगळे टाळतील. तुमचा वेळ वाया जात असला, तरी तुम्ही व्यग्र राहाल. काेणतेही काम वेळेत न करण्याच्या सवयीमुळे तुम्ही फक्त धावपळ करताना दिसाल. तुमच्या मनात कामाची एवढी भीती बसेल, की काेणतेही नवे काम हाती घेण्यास तुम्ही कचराल आणि नवी कामेही तुमच्याकडे येणार नाहीत. कामे टाळण्यासाठी नाना प्रकारचे बहाणे तुमचा मेंदू शाेधेल. ही सवय खूप काळ राहिली, तर तुमचे मनाेधैर्य खचत जाईल आणि हळूहळू तुमच्यातील ऊर्जाही कमी हाेईल. तणाव, चिंता आणि आत्मविश्वास घटण्यासारख्या ‘भेटी’ तुमच्या साेबतीला येतील ते वेगळेच.
 
चालढकल व आळसातील फरक : चालढकल आणि आळस एकच असल्याची समजूत असली, तरी त्या वेगळ्या अवस्था आहेत.
चालढकलीत तुम्ही एक काम करण्याऐवजी आपल्याला आवडणारे दुसरे काम सुरू करता आणि काेणतेच काम न करणे म्हणजे आळस.दीर्घसूत्रतेत न आवडणारे काम अनिश्चित किंवा निश्चित काळासाठी टाळले जाते.पण आळसात केवळ कामच टाळले जात नाही, तर नंतरही ते केले जात नाही. ते काम न करण्याचे ध्येय म्हणजे आळस.चालढकलीची पंचसूत्री : कामे टाळणे, त्यात चालढकल करण्यामागील पाच मुख्य कारणे अशी :
 
1) संबंधित काम करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, ते नंतर करू या विचारातून काही लाेक काम टाळतात.
2) संबंधित काम एवढे माेठे आहे, की ते करण्यासाठी निश्चित वेळ हाती हवा आणि ताे सध्या आपल्याकडे नाही. ताे मिळताच ते काम करू अशा विचाराचे काही लाेक असतात.
3) हाती घेतलेल्या कामात अपयश येण्याच्या भीतीमुळे त्याचा प्रारंभ करणे टाळले जाते.
4) एखादे काम करावे की नाही याचा निर्णय करता न आल्यामुळे काही जण त्याक्षणी ते काम टाळतात.
5) शेवटच्या क्षणांत धावपळ करून ते काम पूर्ण करण्यात काहींना आनंद मिळत असल्यामुळे ते वेळेत काम सुरू करत नाहीत.
मेंदूत निर्माण हाेणारे विचार : तुमच्या घरापासून दहा मिनिटे अंतरावर राहणाऱ्या एका परिचिताकडे तुम्हाला एका तासात भाेजनास जावे लागणार असल्याची कल्पना करा. फक्त दहा मिनिटांचेच तर अंतर आहे, आपण वेळेत पाेहचू असा विचार तुम्ही करता.