माजिवडा मानपाड्यातील पाच अनधिकृत ढाबे ठाणे महापालिकेने हटवले

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

thane_1  H x W: 
 
माजिवडा मानपाडा प्रभागातील विनापरवाना अनधिकृत ढाब्यांवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत हे ढाबे हटवले.पालिका हद्दीत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईची माेहीम महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांच्या आदेशान्वये सुरू आहे. या कारवाईत काेलशेत खाडीकिनारी असलेला विश्वनाथ व्हिलेज, जयमल्हार, राकेश व गझल हे ढाबे तसेच, बाळकुम पाडा नं. 1 पाइपलाइनजवळील शुभ चायनीज या ढाब्यावर कारवाई करून हे ढाबे हटवण्यात आले. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजिवडा मानपाडा प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संताेष वझरकर यांच्या उपस्थितीत दिलीप विखणकर, जयनाथ माळी, सुधाकर गायकवाड, काशिनाथ राठाेड व अतिक्रमण विराेधी पथकाने ही कारवाई केली.शहरातील अनधिकृत बांधकामे व व्यवसायांवरील कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आह