काेणत्या प्रकारच्या चहात किती कॅलरी असतात?

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

tea_1  H x W: 0 
 
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगनुसार, मर्यादित प्रमाणात नियमितपणे चहा घेतल्यास हृदयराेग, कॅन्सर व डायबिटीससारख्या आजारांचा धाेका कमी हाेताे. चहात अधिकांश प्रमाणात पाणी असते; पण काही प्रमाणात कॅफीन असते. मायाे क्ली निकनुसार जाेपर्यंत 500 मिग्रॅ वा त्यापेक्षा जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केले जात नाही ताेपर्यंत हे ड्यूरेटिकप्रमाणे (वारंवार यूरीन आणणारे) काम करीत नाही. दुधाचा चहा वगळता बहुतेक चहांमध्ये कॅलरी अत्यंत कमी प्रमाणात असते.इम्युनिटी बूस्टर आहे ग्रीन टी यामध्येफ्लेवाेनाॅइडस असतात जे बॅड काेलेस्ट्राॅल व ब्लडक्लो टिंग कमी करतात. यामुळे हृदय सुदृढ राहते. त्याचप्रमाणे अलर्टनेस वाढताे.