वृषभ

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
या आठवड्यात तुम्हाला बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असेल तर तसा प्लॅन करावा. हा आठवडा प्रवासासाठी उत्तम आहे. नव्या कामांबाबत क्षेत्रात तुमची स्थिती उत्तम राहील. जास्त खर्चामुळे थाेडा ताण येऊ शकताे. एखाद्या आप्तेष्टाकडे बाेलावल्यानंतर तुम्हाला अपेक्षित मान मिळणार नाही.
 
नाेकरी/व्यवसाय : आत्तापर्यंत तुम्ही जसा विचार करीत हाेता तसे पूर्णपणे नाही याबद्दल देवाचे आभार माना. बराेबर चूक याचा याेग्य निर्णय करून तुम्ही ज्या मार्गाने जात आहात ताे आपल्याला यशाच्या नव्या मार्गावर घेऊन जाईल.सारे काही तुमच्या मनासारखे हाेताना दिसत आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या जाेडीदाराला तुमची सर्वांत जास्त गरज आहे. काेणताही गैरसमज करून घेण्यापूर्वी त्या जागी स्वत:ला ठेवून पाहा.उत्तर आणि मार्ग दाेन्ही सापडेल. कुटुंब व नातलगांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. तुम्ही सांगण्यापूर्वीच तुमचे विचार समजून घेतले जातील. मुलांसाेबत मजेत वेळ घालवाल.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमचे खाणे-पिणे नियंत्रित ठेवावे लागणार आहे. पाेटदुखीचा त्रास संभवताे. पण ताे फार काळ टिकणार नाही. जर तुम्ही बाहेरचे खाणे-पिणे टाळले व खाण्या-पिण्यावर ताबा ठेवला तर या आठवड्यात आराेग्याबाबत फारसा त्रास असणार नाही.
 
शुभदिनांक : 29, 30, 02,
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात दुचाकी वाहन टाळावे. जर चारचाकी वाहन चालवत असाल तर कमीत कमी प्रवास करावा. लांबच्या प्रवासात स्वत: वाहन चालवू नये.
 
उपाय : गुरुवारी हळकुंड, हरभरा डाळ व गूळ केळीच्या झाडाला समर्पित करावी. अक्षता, फुले वाहून प्रदक्षिणा घालावी.