धनू

    30-Nov-2021
Total Views |
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात तुमच्यापैकी काहीजण एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाऊ शकता.तुम्ही तुमच्या वडिलाेपार्जित घरी शिफ्ट हाेण्याचा वा ते भाड्याने देण्याचा विचार करू शकता. तुम्ही आयाेजित केलेल्या एखाद्या समारंभात कुटुंबातील लाेकांना एकत्र येण्याची संधी मिळेल.
 
नाेकरी/व्यवसाय : तुमचा गंभीर स्वभाव बऱ्याचदा तुमच्याविषयी लाेकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करताे. वास्तविक तुमच्यासाठी हे साेपे नाही पण तुमच्या स्वभावातील कडकपणा या आठवड्यात तुम्हाला उपयाेगी पडू शकेल. जर हा पर्सनॅलिटीचा भाग बनवू शकत नसाल तर किमान यावेळी आजमावून पाहा.
 
नातीगाेती : या आठवड्यात नाती सांभाळण्याच्या नादात तुम्ही स्वत:लाच हरवून जाऊ नये. कारण बऱ्याच वेळा तुम्ही असे करीत असता.यामुळे काही काळानंतर तेही तुम्हाला विसरून जाऊ शकतात. यासाठी स्वत:चा आब राखत तुम्ही तुमची नाती जाेपासायला हवीत.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आरामाची नितांत गरज आहे. मानसिकही आणि शारीरिकही जर पूर्वीपासूनच पाठीच्या कण्याची समस्या असेल तर या आठवड्यात ती डाेके वर काढण्याची श्नयता आहे. या समस्येच्या केवळ वेदनेवर उपचार न करता याेग्य प्रकारे उपचार करून घ्यावेत.
 
शुभदिनांक : 28, 01, 04
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात आत्मविश्वास बाळगा आणि इतरांच्या नकारात्मक गाेष्टींवर कमीत कमी प्रतिक्रिया द्या.
 
उपाय : या आठवड्यात मंगळवारी श्रीगणेशाची पूजा व आरती करा. पेढ्याचा नैवेद्य दाखवून ॐ गं गणपतये नम: चा जप करून प्रसाद भक्षण करा.