राेज अर्धा तास काेडी साेडवा अन् मेंदूला तरुण ठेवा

    30-Nov-2021
Total Views |
 
 
ब्रिटनमधील एडिंबर्ग विद्यापीठातील संशाेधन
 

puzzles_1  H x  
 
मेंदूला ताण देणारी काेडी राेज अर्धा तास साेडविल्यामुळे मेंदू दहा वर्षे जास्त तरुण राहील, असे एका नव्या संशाेधनात नमूद करण्यात आले आहे. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ गॅरिअ‍ॅट्रिक सायकीअ‍ॅट्री’मध्ये या संदर्भातील लेख प्रसिद्ध झाला आहे.ब्रिटनमधील एडिंबर्ग विद्यापीठाने याबाबत संशाेधन केले आह बिंगाे, बुद्धिबळ असे खेळ खेळणाऱ्या किंवा शब्दकाेडी साेडविणाऱ्यांची विचारक्षमता जास्त असल्याचे त्यात आढळले.त्यांची बुद्ध्यांक पातळी (आय्नयू लेव्हल) सरासरी 5.6 पाॅइंटपेक्षा जास्त असते.
 
सुडाेकू आणि क्राॅसवर्डची काेडी साेडविणाऱ्यांचा मेंदू दहा वर्षांच्या मुलांएवढा कार्यक्षम असल्याचेही दिसले. मेंदूला दिलेल्या खुराकामुळे स्मृतिभ्रंश, कंपवात आणि नैराश्यासारख्या विकारांचा धाेकाही कमी हाेताे. त्यासाठी राेज अर्धा तास मेंदूला असा व्यायाम द्यावा, असा सल्ला या लेखात देण्यात आला आहे.इंटेलिजंट काेशंट’चे ‘आय्नयू’ हे लघुरूप असून, ती गणिती प्रक्रिया आहे. त्यातून मेंदूच्या क्षमतेची माहिती मिळते. विचार करण्याची आणि ज्ञान मिळविण्याची मेंदूची क्षमता किती हे यामुळे समजते.सर्वसामान्यांची ‘आय्नयू लेव्हल’ 90-110 दरम्यान असते.मेंदूला व्यायाम...
 
डाव्या भागासाठी
 
1) IRNAB या अक्षरांपासून जास्तीत जास्त शब्द तयार करा. प्रत्येक अक्षराचा उपयाेग एकदाच करा आणि तयार केलेल्या शब्दांना अर्थ असायला हवा.
 
2)RAIGET, ENOLYL, OVEOGN आणि LEWRE या सर्व अक्षरांपासून चार रंगांची नावे तयार करा.
 
उजव्या बाजूसाठी
 
1) व्हिज्युअल आर्ट रेखाचित्रे आणि तैलचित्रे काढण्यासारख्या कलांमुळे मेंदूतील क्रिएटिव्ह भाग सक्रिय हाेऊन मेंदूतील उजवा भाग कार्यक्षम हाेताे.
 
2) छंद विकसित करा छंदांमुळे तणाव कमी हाेऊन क्रियाशीलता वाढत असल्याचे ‘वेब एमडी’ने नमूद केले आहे. छंद जाेपासल्यामुळे मेंदूचा उजवा बाग क्रियाशील हाेताे.