मीन

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात प्राेफेशनल पातळीवर वाढलेल्या जबाबदाऱ्या सांभाळणे तुम्हाला थाेडे कठीण जाऊ शकते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात तुमच्याविषयी गैरसमज पसरू शकतात जे तुम्ही चर्चेने दूर करू शकता. तुमचे संबंध काहीसे कमकुवत हाेऊ शकतात. गाडीची समस्या कायमची सुटेल.
 
नाेकरी/व्यवसाय : काेणतेही काम करण्यापूर्वी त्याची याेजना आखणे अत्यंत आवश्यक आहे. या आठवड्यात तुमच्या कामात नियाेजनाची उणीव प्रकर्षाने दिसून येत आहे आणि तुम्हाला याचे नुकसान साेसावे लागणार आहे. हे टाळण्यासाठी प्रथम याेजनांवर व्यवस्थित काम करूनच कामे करावीत.
 
नातीगाेती : नात्यांबाबत या आठवड्यात तुम्ही भाग्यवान राहणार आहात. सारे काही तुमच्या मर्जीनुसारच हाेईल. पण तुम्हाला हेही लक्षात ठेवायचे आहे की, या दरम्यान तुमची माणसे तुमच्यावर नाराज हाेणार नाहीत. आठवड्याच्या अखेरीस मनाेरंजक प्रवासाचा प्लॅन करू शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील, पण मधुमेहाच्या रुग्णांनी औषधासाेबतच पथ्यपाण्याकडेही जास्त लक्ष द्यावे. बदलत्या माेसमासाेबत विपरित आहार तुमच्या तब्बेतीवर जास्त परिणाम करील. आठवड्याच्या मध्यात मान वा खांदेदुखी, डाेळ्यांची जळजळ व दातांसंबंधित समस्या हाेऊ शकते.
 
शुभदिनांक : 28, 01, 04
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : बेपर्वाई वृत्ती तुमच्या स्वभावातून जेवढ्या लवकर बाहेर काढाल तेवढ्या लवकर संधीची जास्त दारे तुमच्यासाठी उघडली जातील..
 
उपाय : या आठवड्यात बुधवारी लवकर उठून स्नानादि कार्ये उरकून एक काशाची थाळी घ्यावी. या थाळीवर चंदनाने ॐ गं गणपतये नम: लिहा. नंतर थाळीत पाच बुंदीचे लाडू ठेवून जवळील श्रीगणेश मंदिरात दान करा.