तूळ

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात एखाद्या स्पर्धेत असणाऱ्या लाेकांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढला जाण्याची अपेक्षा आहे. आर्थिक पातळीवर आपण सुरक्षित स्थितीत असणार आहात. मनाजाेगा खर्च करू शकाल. तुमच्यापैकी काही जण फिटनेससाठी वेळ काढण्यात यशस्वी राहतील.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात भागिदारीच्या कामात सध्या आपण उत्तमप्रकारे पुढे जाऊ शकाल. कदाचित नवा करार करावयाचा असेल तर त्यातही फायदा हाेऊ शकताे. तसा तुमचा भागीदार त्वरित निर्णय घेऊ शकताे.स्थावर संपत्ती वा शेतीवाडीसंबंधित काम करणाऱ्यांसाठी उत्तम काळ आहे.
 
नातीगाेती : तुम्ही घालून दिलेल्या नियमांनुसारच जगाने चालावे अशी तुमची इच्छा असते. पण तुम्ही हे विसरता की, जरी तुमचे कुटुंबीय अशा प्रकारे राहात असले तरी तुमचे मित्र व दूरचे नातलग असे करतीलच असे नाही. सर्वांना तुमच्या नियमांत बांधण्याचा प्रयत्न न कराल तरच चांगले.
 
आराेग्य : तुम्हाला सांध्याचे दुखणे सतावत राहणार आहे. तुम्हाला अनेक प्रकारच्या त्रासांचा सामना करावा लागू शकताे. आठवड्याच्या सुरुवातीला त्रास जरा जास्त असणार आहे पण आठवड्याच्या अखेरीपर्यंत सारेकाही पूर्ववत सामान्य हाेईल. तब्ब्बेतीबाबत काही सवयी तुम्ही टाळायला हव्यात.
 
शुभदिनांक : 29, 30, 02
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुमची बेपर्वाई अनेक अडचणी निर्माण करू शकते.जाेडीदाराच्या भावना दुखावू नका.
 
उपाय : या आठवड्यात शिवपूजनावेळी दही, साखर, तांदूळ, शुभ्र चंदन, इ.वाहावे. शिवपूजेत पांढरी फुले वापरावीत