सिंह

    30-Nov-2021
Total Views |
 
 
 

horoscope_1  H  
 
या आठवड्यात काेणत्याही कामाला त्याच्या महत्त्वानुसार वेळ द्यायला हवा.तुम्हाला तुमचे काेणी त्याचा राेमांचक प्लॅन सांगून सरप्राइज करू शकते. इतरांना प्रभावित करण्याच्या भरीस पडून एखाद्या स्वत:च्या प्लॅनिंगसाठी जास्त खर्च करू शकता. या आठवड्यात तुम्ही उत्साही व उल्हसित राहाल.
 
नाेकरी/व्यवसाय : खूप काही मिळवता मिळवता तुमच्या हातून निसटून जाईल. वास्तविक यासाठी तुम्ही स्वत: नव्हे तर तुमच्या साेबत काम करणारे तुमचे सहकारी जास्त जबाबदार असणार आहेत, पण त्यासाठी तुम्हालाच जबाबदार धरले जाऊ शकते. काेणतेही काम वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या जाेडीदाराला तुमची सर्वांत जास्त गरज आहे, पण गेल्या काही आठवड्यांपासून तुमचे वागणे बदलल्यासारखे वाटत आहे.नाते बिघडले जाऊ नये यासाठी वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळ देणे व सुख-दु:खात साथ देणे आवश्यक आहे
.
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर ताबा ठेवण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तुम्ही ज्या आराेग्यविषयक समस्येला ताेंड देत आहात त्याच्या मुळाशी तुमचे खराब खाणे-पिणेच आहे.याआठवड्यात चवीवर ताबा ठेवून साधे जेवण्यास प्राधान्य द्यावे.
 
शुभदिनांक : 28, 01, 04
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : जरी तुम्ही एकटेच खूप काही करू शकत असला तरी या आठवड्यात साेबतच्या व्य्नतींवर विश्वास ठेवून त्यांच्यावरही जबाबदारी टाका.
 
उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक नारळ फाेडा.त्यानंतर त्याचा प्रसाद स्वत:ही खा व आपल्या मित्र व कुटुंबीयांनाही द्या.